Sidhu Musewalas parents visit Amit Shah Demand for high level inquiry Sidhu Musewalas parents visit Amit Shah Demand for high level inquiry
देश

मुसेवालाच्या पालकांनी घेतली शाहांची भेट; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

सकाळ डिजिटल टीम

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याचे वडील आणि आई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची शनिवारी (ता. ४) चंदीगडमध्ये भेट घेतली. ही बैठक १० ते १५ मिनिट चालली. मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी शाह यांच्याकडे हत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. (Sidhu Musewalas parents visit Amit Shah Demand for high level inquiry)

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose Wala) गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धूला काही गुंडांकडून धमक्या येत होत्या. त्यानंतरही पंजाबमधील आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) सिद्धूची सुरक्षा काढून घेतली होती. सरकारने सुरक्षा हटवल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धूची हत्या झाली होती.

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चंदीगडमध्ये आहे. यादरम्यान सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या पालकांनी शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आणि १० ते १५ मिनिटे चर्चा केली. मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी शाह यांच्याकडून हत्येची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. यावेळी भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

पंजाबमध्ये भाजप पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न

सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या आई-वडिलांची भेट घेतल्यानंतर अमित शाह चंदीगड भाजप कार्यालयाकडे रवाना झाले. पंजाब काँग्रेसचे आणखी चार बलाढ्य नेतेही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. नुकतेच पंजाबचे माजी पीसीसी प्रमुख सुनील जाखड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंजाबमध्ये भाजप पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अमित शाह पक्षाच्या नेत्यांची मोठी बैठकही घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT