adar poonawala1 Esakal
देश

सीरमच्या ‘कोवोव्हॅक्स’ लसीच्या आपत्कालीन वापरास WHO ची मंजुरी

कोव्होव्हॅक्स लसीच्या वापराला मंजुरी मिळाणारी भारतातील ही तिसरी लस आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होवॅक्स (COVID19 vaccine Covovax) लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत सीरम इन्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Serum Institute of India) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्वीट केले आहे. कोवोव्हॅक्स लस कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कोविशील्ड, कोव्हॅक्सीन नंतर कोव्होव्हॅक्स लसीच्या वापराला मंजुरी मिळाणारी भारतातील ही तिसरी लस आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून सीरमच्या आणखी एका लसीच्या आपत्काली वापराला मान्यता मिळाल्यामुळे 18 वर्षाखालील मुलांच्या लसीचा मार्ग सुकर झाला आहे. कोवोव्हॅक्स लस सिरमने नोव्हावॅक्स कंपनीच्या सहकार्याने विकसित केली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व चाचण्यांमध्ये ही लस खूप प्रभावी ठरली आहे. या कारणास्तव, WHO ने आपत्कालीन वापरासाठी याला मंजुरी दिली आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशांना या लसींचा खूप फायदा होईल आणि अल्पावधीत जलद लसीकरण पूर्ण होण्यास मदत असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.

ZyCoV-D लसीला मंजुरी

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) आपत्कालीन वापरासाठी दिलेली एकमेव लस ही 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी मंजूर करण्यात आलेल्या लसींपैकी एक आहे. ही लस अहमदाबाद येथील झायडस कॅडिलाची आहे. (Zydus Cadila) मात्र, आतापर्यंत या लसीचा देशाच्या लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आलेला नाही. तसेच, DCGI च्या तज्ज्ञांनी 12-18 वयोगटासाठी हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची शिफारस केली असून, अंतिम मंजुरीपूर्वी कंपनीकडून अतिरिक्त माहिती मागवण्यात आल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT