Fire  Sakal
देश

Hyderabad Fire : इलेक्ट्रिक स्कूटर शोरूममध्ये भीषण अग्नितांडव; आठ जणांचा मृत्यू

सिकंदराबाद येथील एका भागात रूबी लॉज नावचे हॉटेल आहे. तर, याच्या तळमजल्यवर इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग स्टेशन आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hyderabad Fire : तेलंगणातील सिकंदराबाद येथे मंगळवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. सिकंदराबाद येथील एका हॉटेलच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागून ही दूर्घटना घडल्याचे हैदराबादचे आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिकंदराबाद येथील एका भागात रूबी लॉज नावचे हॉटेल आहे. तर, याच्या तळमजल्यवर इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग स्टेशन आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका गाडीच्या बॉटरीचा स्फोट झाला आणि आग लागली. ही आग काही क्षणात वर असलेल्या हॉटेलपर्यंत पोहोचली. रात्रीची वेळ असल्याने हॉटेमधील नागरिकांना काही समजण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. तर काहींनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या. मात्र, काहींना या घटनेचा अंदाज न आल्याने आग आणि धुरामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

घटनेवेळी हॉटेलमध्ये सुमारे 23-25 ​​लोक होते. यातील काही जाणांनी उड्या मारत स्वताचा जीव वाचवला, तर काही जण तेथेच अडकले. त्यामुळे आग आणि धुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून, 10 हून अधिक लोक या घटनेच गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर मंत्री टी श्रीनिवास यादव, गृहमंत्री महमूद अली आणि हैदराबाद शहर पोलिस आयुक्त आनंद यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर

दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच घडलेली घटना अतिशय वेदनादायी असल्याच्या भावना पंतप्रधान कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची तर, जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT