Monsoon News Updates google
देश

'मान्सून केरळात आलाच नाही'; हवामान विभागाच्या माहितीवर 'स्कायमेट'चा दावा

एका दिवसाच्या निरीक्षणाद्वारे अंदाज व्यक्त करणे हे निकषांचं उल्लंघन आहे असा दावा स्कायमेटने केला आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती २९ मे रोजी दिली होती. पण या माहितीवर आता मतभेद होत आहेत. स्कायमेट (Skymet) या संस्थाने हवामान विभागाच्या (India Meteorological Department) या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. केरळात मान्सून दाखल झाला नाही असा दावा स्कायमेटने केला आहे.

(Monsoon Rain Update)

एका दिवसाच्या निरीक्षणाद्वारे अंदाज व्यक्त करणे हे निकषांचं उल्लंघन आहे असा दावा स्कायमेटने केला आहे. तसेच यापूर्वी असं कधी घडलं नाही असं स्कायमेटने म्हटलं असून त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट या संस्था आमने सामने आल्या आहेत.

(Skymet Vs Indian Meteorological Department)

दरम्यान स्कायमेटचा हा दावा भारतीय हवामान विभागाने फेटाळून लावला आहे. पण स्कायमेट केरळमध्ये मान्सून दाखल न झाल्याचा आपल्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे दोन्ही संस्थामध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. स्कायमेटच्या माहितीनुसार जर केरळात मान्सूनचे आगमन झाले असेल तर तिथे कमीत कमी दोन दिवस सारखा पाऊस पडला पाहिजे. या दोन दिवसात ६० टक्क्याहून आणि २.२ मीमी पेक्षा अधिक पाऊस पडला तर आपण केरळात मान्सून दाखल झाल्याचा दावा करू शकतो असं स्कायमेटने म्हटलं आहे.

मान्सूनच्या आगमनाच्या तीन निकषांपैकी दोन निकष पूर्ण होत नसल्याचा दावा स्कायमेटने केला आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभाग आमनेसामने आले आहेत. पण हवामान विभागाने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता हवामान विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT