Small Girl born 2 days ago died Small Girl born 2 days ago died
देश

२ दिवसांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीला फेकले; मुंग्या चावल्याने मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

दोन दिवसांपूर्वी जन्मलेली चिमुकली नागरिकांना नाल्यात सापडली. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले. चिमुकलीच्या अंगभर मुंग्या चावल्या होत्या. यामुळे उपचारादरम्यान मृत्यू (Small Girl died) झाला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील सतना येथे घडली. (Small Girl born 2 days ago died)

प्राप्त माहितीनुसार, सतना जिल्हा मुख्यालयापासून २१ किमी अंतरावर असलेल्या कोठी शहरातील एका नाल्याजवळ नवजात अर्भक (Infant) जिवंत अवस्थेत नागरिकांना दिसले. नागरिकांनी याची माहिती लगेच पोलिसांना दिली. पोलिसांनी नवजात चिमुकलीला सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला.

नवजात चिमुकलीला सामुदायिक आरोग्य केंद्र कोठी येथे दाखल केले असता मुंग्यांच्या चाव्याच्या खुणा अंगभर आढळून आल्या. चिमुकलीच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे कारण भूकही (starvation and ant bite) सांगण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. सतना-चित्रकूट रस्त्यावरील नाल्यात दगडांमध्ये सापडलेल्या नवजात चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये हायपोग्लायसेमियाही आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, भूक लागणे आणि जास्त वेळ उन्हात राहणे हे याचे कारण आहे.

अनैतिक संबंधातून चिमुकलीचा जन्म?

चिमुकलीच्या अंगात ग्लुकोजचे प्रमाणही कमी असल्याचे आढळले. ज्यामुळे तिचा मृत्यू (Small Girl died) झाला. कोठी पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र, चिमुकलीला नाल्यात कोणी फेकले हे अद्याप समजू शकलेले नाही. अनैतिक संबंधातून चिमुकलीचा जन्म झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT