Crime News esakal
देश

चिमुकलीवर बलात्कार करून हत्या; शिक्षा ऐकताच आरोपीने केले हे कृत्य

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली

सकाळ डिजिटल टीम

गुजरात : पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Atrocities) करून हत्या (small girl murder) केल्याप्रकरणी आरोपीला न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावली. ही शिक्षा ऐकून आरोपीला धक्काच बसला आणि त्याने कोर्टरूममध्येच न्यायाधीशांना चप्पल फेकून मारली. मात्र, ही चप्पल साक्षीच्या बॉक्सजवळ पडली. यानंतर आरोपीला पकडून नेण्यात आले. ही घटना सुरतमधील न्यायालयात घडली.

मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने ३० एप्रिल रोजी पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. मृत ही परप्रांतीय मजुराची मुलगी होती. मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने चॉकलेट आणण्याच्या बहाण्याने तिचे अपहरण केले. तो मुलीला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार (Atrocities) केला. यानंतर तिचा गळा दाबून ठार (small girl murder) केले.

या घटनेनंतर सुरतमधील हजिरा पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने २६ साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरले. न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी ५३ कागदोपत्री पुराव्यांचाही विचार केला. त्यानंतर बुधवारी २७ वर्षीय तरुणाला पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) सुनावली.

विशेष पॉक्सो न्यायाधीश पीएस काला यांच्या कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीला राग आला आणि त्याने न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल फेकली. आरोपीच्या मोबाईलमध्ये प्राण्यांच्या अश्लील क्लिपसह अश्लील व्हिडिओही सापडले होते. आरोपीची मानसिक स्थिती दाखवण्यासाठी मोबाईलही न्यायालयात सादर करण्यात आला. त्याने यापूर्वीही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या (small girl murder) केल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT