Smriti Irani  esakal
देश

स्मृती इराणी, मुलगी झोईश 'त्या' रेस्तराँचे मालक नाहीत; हायकोर्टाची क्लीनचीट

गोव्यातील एका कथित बेकायदा रेस्तराँमुळं स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी चर्चेत आले होते. यावरुन इराणींना मोठी टिका-टिपण्णी झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी झोईश ही गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील एका बेकायदा रेस्तराँमुळं चर्चेत आले होती. या रेस्तराँमध्ये गोमांस मिळत असल्याची बाबही समोर आल्यानं यावरुन अनेकांनी स्मृती इराणी टीकेच्या धनी झाल्या होत्या. पण आता दिल्ली हायकोर्टानं इराणी आणि त्यांच्या मुलीला या प्रकरणात क्लीनचीट दिली आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Smriti Irani daughter not owners of Goa restaurant no license issued says Delhi High court)

दिल्ली हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं की, "केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची कन्या झोइश इराणी या दोघीही गोव्यातील रेस्तराँच्या मालक नाहीत. या दोघींनी या रेस्तराँच्या परवान्यासाठी कुठलाही अर्ज केलेला नाही, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. हे रेस्तराँ किंवा त्याच्या जागा या दोन्हींपैकी एकही गोष्ट स्मृती इराणी किंवा त्यांच्या मुलीच्या मालकीची नाही"

दरम्यान, स्मृती इराणी यांच्या मुलीनं वकिलांमार्फत यापूर्वीच आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. गोव्यातील 'सिली सोल्स' नावाच्या रेस्तराँचे आपण मालक नाहीत, ना मी चालवते. तसेच स्मृती यांनी देखील आरोप फेटाळून लावत स्पष्ट केलं होतं की, ही लढाई आपण न्यायालयात न्यायालयात लढू.

काँग्रेसने आरोप करताना म्हटलं होतं की, उत्पादन शुल्क विभागाने इराणी यांच्या मुलीला कारणे दाखवा नोटीस दिली होती. नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्याची कथितरित्या बदली करण्यात येत आहे. ही माहिती आरटीआयमधून मिळाली आहे. इराणींच्या मुलीने सिली बनावट दस्तऐवज देऊन बार लायसन्स मिळविले, असा काँग्रेसचे मीडिया व प्रचारप्रमुख पवन खेडा यांनी केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणींना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अशी मागणीही त्यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shivaji University GeM Purchase: प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल जीईएम खरेदी व्यवहारांची तपासणी सुरू; अंतर्गत लेखापरीक्षक करणार मार्गदर्शक सूचना

SCROLL FOR NEXT