SN Shrivastava who has been given additional charge as the Commissioner of Delhi Police
SN Shrivastava who has been given additional charge as the Commissioner of Delhi Police 
देश

आयपीएल मॅच फिक्सिंग उघड करणाऱ्या अधिकाऱ्यावर आता दिल्लीची जबाबदारी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरण उघड करणाऱ्या एसएन श्रीवास्तव यांच्यावर आता दिल्लीची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीवास्तव यांची दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंसाचार रोखण्यात दिल्ली पोलिस अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर मोठया प्रमाणात टीका सुरु आहे. अमूल्य पटनायक यांची जागा एसएन श्रीवास्तव यांना देण्यात आली आहे. दिल्ली जळत असताना पोलिस कुठे होते? असा संतप्त सवाल अनेकजण करत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीवास्तव यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीतील या हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला.

Delhi Violence : आप नेत्यावर संशयाची सुई; पक्षातून हकालपट्टी 

तत्पूर्वी, एसएन श्रीवास्तव हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना सीआरपीएफमधून पुन्हा दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी आणण्यात आले आहे. एसएन श्रीवास्तव यांच्या कार्यकाळात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीएल मॅच फिक्सिंगचा खुलासा केला. तेव्हा ते, स्पेशल सेलचे विशेष पोलिस आयुक्त होते. अमूल्य पटनायक उद्या २९ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT