Highest Average Salary eSakal
देश

Highest Average Salary : सोलापुरी सगळ्यात भारी! पगार देण्यात देशात ठरलं नंबर वन, मुंबई-पुणे अन् बंगळुरूलाही टाकलं मागे.. जाणून घ्या कसं

विविध राज्यांच्या सरासरी पगाराचा विचार केला, तर त्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे.

Sudesh

भारतातील नोकरदार व्यक्तींचा सरासरी वार्षिक पगार हा १८,९१,०८५ रुपये आहे. तर यामध्ये सगळ्यात सामान्य कमाई ही ५,७६,८५१ असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. जुलै २०२३ पर्यंतच्या सरासरी वेतन सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीनुसार, शहरांमधील सर्वाधिक वार्षिक सरासरी पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील एका शहराने मुंबई, दिल्ली आणि टेक सिटी बंगळुरूलाही मागं टाकलं आहे. हे शहर म्हणजे, सोलापूर! सोलापुरातील वार्षिक सरासरी पगार हा २८ लाख १० हजार ९२ रुपये असल्याचं या आकडेवारीत स्पष्ट झालं आहे.

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे, जिथला वार्षिक सरासरी पगार हा २१ लाख १७ हजार ८७० रुपये आहे. सोलापूरच्या तुलनेत मुंबई देखील बरीच मागे आहे. तर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमधील सरासरी वार्षिक पगार हा २१ लाख १ हजार ३८८ रुपये आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये ही रक्कम २० लाख, ४३ हजार ७०३ रुपये आहे.

पुणे आणि श्रीनगरमध्ये सरासरी वार्षिक पगार हा १८ लाख ९५ हजार ३७० रुपये आहे. तर, हैदराबादमधील सरासरी वार्षिक पगार १८,६२,४०७ रुपये असल्याचं या आकडेवारीमध्ये स्पष्ट झालं आहे.

राज्यांमध्ये यूपी आघाडीवर

भारतातील विविध राज्यांच्या सरासरी पगाराचा विचार केला, तर त्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. यूपीमध्ये २०,७३० रुपये सरासरी पगार मिळतो. तर दुसऱ्या क्रमांकावर २०,२१० रुपये सरासरी पगारासह पश्चिम बंगाल आहे. औद्योगिक क्षेत्रात पुढे असलेलं महाराष्ट्र या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात सरासरी पगार हा २०,११० रुपये आहे.

महिलांना पगार कमी

पुरूष आणि महिलांच्या सरासरी पगारात बरीच तफावत असल्याचं या आकडेवारीमध्ये दिसून आलं आहे. जिथे पुरूषांचा सरासरी वार्षिक पगार १९,५३,०५५ रुपये आहे, तिथे महिलांचा सरासरी वार्षिक पगार हा केवळ १५,१६,२९६ रुपये असल्याचं आकडेवारीत स्पष्ट झालं.

शिक्षितांना पगार जास्त

तुम्ही जेवढे शिकले असाल, तेवढा जास्त पगार मिळण्याची शक्यता असते असंदेखील या आकडेवारीत दिसून आलं आहे. डॉक्टरेट पदवी असलेले लोक सर्वाधिक (सरासरी २७,५२,४०७ रुपये) पगार मिळवतात. तर, हायस्कूल पदवीपेक्षा कमी असलेले लोक सरासरी ११,१२,४९९ रुपये कमावतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT