नवी दिल्ली- देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची (COVID19 cases) संख्या कमी होत असल्याची ( decrease in daily new COVID19 cases ) चांगली बातमी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाना, चंदीगड, बिहार आणि गुजरात राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health) सांगण्यात आलंय. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (some states showing continuous decrease in daily new COVID19 cases Ministry of Health)
१ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण १३ राज्यांमध्ये आहेत, तर ५० हजार ते १ लाख कोरोना रुग्ण ६ राज्यांमध्ये आहेत, तर ५० हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या १७ राज्यांमध्ये आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदीगढ, लडाख, दमन-दीव आणि निकोबार बेटांवर सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. यासंदर्भातील ग्राफ शेअर करण्यात आला आहे.
काही राज्यांमध्ये रुग्णसंख्यावाढ पाहायला मिळतेय. यामध्ये विशेष करुन विधानसभा निवडणुका झालेल्या राज्यांचा समावेश आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिसा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुचेरी, मनीपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख चढता आहे.
दरम्यान, सोमवारी दिवसभरात 3 लाख 29 हजार 942 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 56 हजार 82 जण कोरोनामुक्त झाले. गेल्या 24 तासात 3 हजार 876 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याआधी रविवारी देशात तीन लाख 66 हजार 161 नवीन रुग्ण आढळले होते. तर गेल्या आठवड्यात बुधवार ते शनिवार लागोपाठ चार दिवस दररोज 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या सव्वा तीन लाखांवर खाली आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.