mobile network
mobile network  Google
देश

डिजिटल इंडियातलं गाव पण नेटवर्कच नाही; टेकडीवर भरते शाळा

सकाऴ वृत्तसेवा

अनेकांना नेटवर्कमध्ये अडचणी येतात. काही ठिकाणं तर अशी आहेत जिथं आजिबात नेटवर्क नाही. अशाही परिस्थिती शिक्षण सुरु रहावं यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकही धडपडताना दिसतात.

कोरोनाच्या (Corona) काळात सगळं काही ठप्प झालं आहे. यातच कंपन्यांची कामेही ऑनलाइन (Online) केली जात आहेत. इतकंच काय शाळासुद्धा ऑनलाइन घेतल्या जात आहेत. मात्र अनेकांना नेटवर्कमध्ये अडचणी येतात. काही ठिकाणं तर अशी आहेत जिथं आजिबात नेटवर्क नाही. अशाही परिस्थिती शिक्षण सुरु रहावं यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकही धडपडताना दिसतात. काश्मीरच्या खोऱ्यात अनेक गावं अशी आहेत जिथं टेकड्यांवर शाळा भरतात. जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and kashmir) शिक्षण विभागाने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम (Learning management system) सुरु केली आहे. या सिस्टिममध्ये शाळेत घेण्यात येणाऱ्या तासाचे अपडेट करण्यासाठी शिक्षकाला त्याच्या गावातून तीन किमी चालत जावं लागतं. तिथं एक किलोमीटर टेकडी चढल्यानंतर स्मार्टफोनला नेटवर्क येतं. त्यानंतर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमच्या पोर्टलवर त्याला शिकवणीचे अपडेट अपलोड करता येतात. (some villages in jammu and kashmir do not have a smartphone network)

शिक्षकांची जशी अवस्था आहे तशीच परिस्थिती विद्यार्थ्यांचीही आहे. आई-वडिलांचे मोबाइल घेऊन विद्यार्थी टेकडीवर, मोकळ्या जागेत जिथं नेटवर्क मिळतं तिथं बसून क्लास सुरु होण्याची वाट पाहतात. ऑनलाइन क्लास जॉइन करण्यासाठी अनेकदा नेटवर्क चांगलं नसतं परंतू तरीही ते वाट पाहतात, लेसन (धडा) अपडेट झाला की त्यांना निदान घरी जाऊन तरी त्याचा अभ्यास करता येईल अशी त्यांना आशा असते. गावात एका ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतात, एकत्र येऊन अगदी परीक्षा देतात. परंतु अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

याबाबत मनझूर अहमद चाक म्हणाले, माझा शिक्षणासाठीचा संघर्ष हा आता आमच्या मुलांचा संघर्ष आहे. एका हायस्कूलमध्ये शिकवणारे चाक आणि विद्यार्थी हे बारामुल्लातील लिंबरमध्ये राहतात. झेलम नदीच्या पलिकडे श्रीनगरपासून (Srinagar) 90 किमी अंतरावर वसलेल्या या गावात रस्त्याची सोय मात्र नाही. इथं एखादा लँडलाइनसुद्धा नाहीय.

हाफिज बारामुल्ला येथील भाड्याच्या खोलीतून त्याच्या ऑनलाइन परीक्षेसाठी बसला जिथे त्याने स्थिर इंटरनेट कनेक्शनसह चार दिवस मुक्काम करून दोन हजार रुपये दिले आहेत.

अहमद म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी गावात नेटवर्क कधीही चांगले मिळत नाही. खेड्यातही, लोक संपर्कात राहण्यासाठी घरोघरी फिरतात. दरवर्षी सुमारे 20 टक्के लोक आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तात्पुरते स्थलांतर करतात.

विद्यार्थी रुफ अहमद म्हणाले, इथे नेटवर्क नसल्यामुळे एखादे लेसन डाउनलोड करण्यासाठी आम्हाला चार दिवस लागतात. या गावात नेटवर्कमुळे अनेक अडचणी येत आहेत.

गावातील अनेक रहिवाशांनी असेही सांगितले की, कोरोनाचे संकट आपल्या सर्वांसमोर उभे आहेत. अशातच नेटवर्कची अडचण येत असल्यामुळे कोविड लसीकरणासाठी नावनोंदणी करू शकले नाहीत. 'खेड्यातल्या काही वडिलोपार्जित लोकांना लस दिली गेली आहे.

बारामुल्ला उपायुक्त भूपिंदर कुमार म्हणाले, गावातील हा नेटवर्कचा विषय मला पूर्ण माहित नव्हता. आता याबद्दल समजले आहे, मी या समस्येकडे लक्ष देत आहे.

अशाप्रकारे अडचणीचा डोंगर निर्माण झालेला असताना देखील शिक्षकांना त्याच्या गावातून तीन किमी चालत जावं लागतं. तिथं एक किलोमीटर टेकडी चढल्यानंतर स्मार्टफोनला नेटवर्क येतं आहे. (some villages in jammu and kashmir do not have a smartphone network)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT