Crime News:  
देश

Crime News: मुलगा की राक्षस! 5 हजार दिले नाही म्हणून आईची हत्या करुन मृतदेह सुटकेसमध्ये फिरवला

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये एक तरुण मोठी सुटकेस घेऊन फिरत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याची चौकशी केली असता सत्य समोर आले.

Sandip Kapde

Crime News: उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईची हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.  हिमांशू असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील गोपालगंज येथील आहे.

हरियाणातील हिसारमध्ये त्याने आईची हत्या केली होती. हत्येनंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरून ट्रेनने प्रयागराजला आणला. तो आपल्या आईचा मृतदेह संगमात टाकण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांची नजर त्याच्यावर पडली आणि तो पकडला गेला.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये एक तरुण मोठी सुटकेस घेऊन फिरत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याची चौकशी केली असता तो घाबरला. त्याचे सुटकेस बघितली असता पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. हा मृतदेह त्याच्या आईचा असल्याचे हिमांशूने सांगितले. (Latest Marathi News)

प्रयागराज पोलीस उपायुक्त (शहर) दीपक भुकर याबाबत सविस्तर माहिती दिले. ते म्हणाले, हिमांशूने त्याची आई प्रतिमा देवी यांच्याकडे ५,००० रुपये मागितले होते. जे आईने देण्यास नकार दिला होता. यानंतर रागाच्या भरात हिमांशूने आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून ट्रेनने प्रयागराजला पोहोचला.

हिमांशू सुटकेस घेऊन फिरत होता, ते पाहून पोलिसांना संशय आला आणि त्याची चौकशी केली. मात्र त्याला कोणतेही अचूक उत्तर देता आले नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी सुटकेसमध्ये काय आहे असे विचारले असता तो गोंधळला आणि घाबरला होता. (Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महायुती सरकारला झटका

Akola News : अकोट मध्ये ‘एमआयएम’ कडून स्वीकृत नगरसेवक म्हणून जितेन बरेठिया; भाजप नेत्याच्या पुत्राच्या सहभागाने पुन्हा राजकीय भूकंप!

Pune News : पुण्यात भाजप कार्यकर्त्यांना 'फ्लेक्सबाजी' करण्यास सक्त मनाई; शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पक्षाचे कडक आदेश!

Pune Crime : विश्रांतवाडी बस थांब्यावर पुणे पोलिसांची सापळा रचून कारवाई; कुख्यात गुंड अरबाज शेख अटक!

Supriya Sule : "पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असणार"- खासदार सुप्रिया सुळे!

SCROLL FOR NEXT