देश

'तेरा मुझसे हैं...' गाणं म्हणत पूर्ण केली आईची अखेरची इच्छा

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत नेटकऱ्यांच्या डोळ्यातही तरळलं पाणी

शर्वरी जोशी

कोरोना (corona) विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर, कित्येक जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. यामध्येच अशीही काही लहान मुलं आहेत, ज्यांच्या आई-वडिलांचं दोघांचंही कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही मुलं पोरकी झाली आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये एका मुलाचा आणि त्याच्या आईचा (mother) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. आपल्या आईची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी या तरुणाने जे केलं ते पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत नेटकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी तरळलं आहे. (son sings the last song for his mother suffering from corona)

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या व्हिडीओविषयी दिपशिखा घोष या डॉक्टरांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सांगितलं केला आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. दिपशिखा घोष यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक कोविडग्रस्त महिला मरणाच्या दारात उभी असतांना तिची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाची धडपड दिसून येत आहे. आपल्या मुलाने गायलेलं गाणं ऐकत या महिलेने अखेरचा श्वास घेतला.

दिपशिखा यांच्या रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये एक महिलेवर उपचार सुरु होते. या महिलेसोबत तिच्या कुटुंबियांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, अन्य कुटुंबियांनी कोरोनावर मात केली. मात्र, त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु होते. याच वेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी या महिलेच्या मुलाला फोन केला आणि त्यावेळी या महिलेने आपल्या मुलाकडे शेवटची इच्छा व्यक्त केली. या महिलेने मुलाला एक गाणं म्हणण्यास सांगितलं.

आपल्या आईची इच्छा म्हणून या मुलाने तेरा मुझसे हैं पहले का नाता कोई हे गाणं म्हटलं. मात्र, आपल्या आईची अवस्था पाहून या मुलाचं मन भरुन आलं आणि त्याचा कंठ दाटून आला. परंतु, स्वत:ला सावरत त्याने हे गाणं पूर्ण केलं. त्यानंतर डॉक्टरांचे धन्यवाद म्हणून फोन ठेऊन दिला.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. इतकंच नाही तर संपूर्ण रुग्णालयात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आणि हे गाणं कायम आमच्या लक्षात राहिल असं डॉक्टरांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT