Untitled-5.jpg 
देश

शाहीनबाग गोळीबाराबाबत सोनम कपूर म्हणते...

वृत्तसंस्था

मुंबई : दिल्लीच्या शाहीन बाग येथील झालेल्या गोळीबाराच्या प्रकाराचा सर्वच क्षेत्रातून निषेध नोंदविण्यात येत आहे. आता बाॅलिवूड स्टार देखील शाहीनबाग येथे केलेल्या गोळीबाराच्या निषेधात बोलू लागले आहेत.

अभिनेत्री सोनम कपूर हिने देखील टि्वट करत या प्रकाराचा निषेध नोंदविला आहे. सोनम याबाबत टि्वट करत म्हणाली, आपल्या देशात असाही प्रकार घडू शकतो असे मला केव्हा वाटले नव्हते. असं होऊ शकतं असे केव्हाही वाटले नव्हते. राजकीय पक्षांनी या देशात दुफळी निर्माण करण्याचे राजकारण थांबवावे. हे राजकारण देशासाठी धोकादायक आहे.

दिल्ली येथील शाहीनबाग येथे गेल्या काही दिवसांपासून CAA कायदयाविरोधात आंदोलन सुरु आहे. त्याच दरम्यान एका माथेफिरूने या ठिकाणी हवेत गोळीबार केला. सोनमने आपल्या टि्वटमध्ये एक बातमी शेअऱ करत म्हटले आहे की, ही घटना अशी आहे की ज्याबद्दल केव्हाही विचार केला नव्हता. असा विचार देखील केव्हा मनात आला नाही की, आपल्या देशात असा प्रकार घडेल. देशात दुफळी पाडणारे हे राजकारण बंद व्हायला हवे. अशा प्रकारचे राजकारण देशात व्देषाची भावना वाढीस लावत आहे.

सोनम पुढे म्हणते की, आपला हिंदू धर्म कर्म आणि धर्म याच्याशी निगडीत आहे. जामिया नगर येथे CAA विरोधात आंदोलन सुरु आहे. शाहीन बाग येथे सुरु असलेल्या आंदोलन सुरु असताना शनिवारी हवेत गोळीबार करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या माथेफिरूला पकडण्यात आले आहे. येथील स्थानिकांनी सांगितले की, या माथेफिरूला घेऊन जात असताना तो घोषणाबाजी करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

SCROLL FOR NEXT