देश

दिल्लीत सोनिया गांधी-शरद पवार यांच्यात आज चर्चा

वृत्तसंस्था

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (ता. 17) दिल्लीत भेट होणार असून, राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग येणार आहे. 

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप यांच्यात ताणाताणी झाल्यानंतर दोन आठवडे राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असून, या पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली होती. या वेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला होता.

सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव वेणुगोपाल मुंबईत आले होते. त्यांनी पवार यांच्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून शिवसेनेसोबत पुढील चर्चा करण्याचे सूचित केले होते. या अनुषंगाने सत्ता स्थापन करण्यासाठी तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांत सामाईक समान कार्यक्रम ठरविण्यासाठी मुंबईत बैठका झाल्या.

या बैठकांत निश्‍चित केलेला अहवाल सोनिया गांधी यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात येणार आहे. आता उद्या शरद पवार दिल्लीत दाखल होणार असून, राज्यातील सत्तास्थापनेवर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. 

आज राष्ट्रवादी कोअर कमिटीची बैठक

दिल्ली येथे जाण्याआधी शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक उद्या (ता. 17) पुण्यात आयोजित केली आहे. राज्यातील सत्ता स्थापन करण्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा करून त्यानंतर पवार दिल्लीसाठी रवाना होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सांगण्यात आले. 

उद्धव-सोनिया भेट

राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी आघाडी उदयास आली आहे. या अनुषंगाने कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून सभाषण झाल्याचे समजते.

सोनिया गांधी यांच्याशी ठाकरे यांची अद्याप चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता उद्धव ठाकरे हे लवकरच नवी दिल्लीला जाणार असल्याचेही शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT