Sonia Gandhi asked ED for three weeks time Sonia Gandhi asked ED for three weeks time
देश

सोनिया गांधी ईडीकडे मागितला तीन आठवड्यांचा वेळ; अद्याप उत्तर नाही

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित काँग्रेस अध्यक्षांची पुनरावृत्ती चाचणी वेळेवर केली जाईल. मात्र, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सोनिया यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीसमोर (ED) हजर राहण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, ईडीकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (Sonia Gandhi asked ED for three weeks time)

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या महिन्यात कोरोनाच्या विळख्यात आल्या. कोरोनाची लागण होण्यापूर्वी सोनिया गांधी या मे महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे आयोजित पक्षाच्या चिंतन शिबिरात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात राहुल गांधींशिवाय पक्षाचे जवळपास सर्वच मोठे नेते सहभागी झाले होते.

सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, कोरोनाबाधित सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीसमोर हजर राहण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, ईडीकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. ईडीने सोनिया गांधी यांना ८ जून रोजी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. सोनिया गांधी आणि राहुल गांधी ईडीसमोर हजर होतील. कारण, त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे काँग्रेसने बुधवारी (ता. ८) सांगितले.

राहुल गांधी गेल्या आठवड्यातच भारतात परतले

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Sonia Gandhi) यांना कथित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने १३ जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने (ED) यापूर्वी राहुल गांधींना २ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, त्यांनी देशाबाहेर असल्याचे सांगत हजर राहण्यासाठी आणखी काही तारखेची विनंती केली होती. राहुल गांधी गेल्या आठवड्यातच भारतात परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT