Sonia Gandhi  Sakal
देश

Sonia Gandhi Birthday : सोनिया गांधींच्या लग्नाशी 'बिग बीं' चा संबंध; जाणून घ्या किस्सा

निया यांचे खरे नाव अँटोनिया माइनो असे होते.

सकाळ डिजिटल टीम

Sonia Gandhi Birthday : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या देशातील सर्वात जुना राजकीय पक्षाची धुरा संभाळत आहेत. सोनियांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ रोजी इटलीतील एका छोट्या गावात झाला. सोनिया यांचे खरे नाव अँटोनिया माइनो असे होते.

हे ही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

सोनिया गांधींचे वडील आधुनिक विचारांचे होते, असे म्हटले जाते. त्यामुळेच त्यांनी सोनियांना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. त्यावेळी इटलीत राहणाऱ्या अँटोनिया म्हणजेच आताच्या सोनिया गांधींनीही विचार केला नसेल की, इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांचे नाते भारताशी जोडले जाईल. आज सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त राजीव गांधी यांची भेट, प्रेम ते लग्न याबद्दल माहिती सांगणार आहोत.

अशी झाली सोनिया-राजीव यांची पहिली भेट

असे म्हटले जाते की, सोनिया गांधींना लेखन आणि वाचनाची विशेष आवड होती. मात्र, त्यांना भारताबद्दल फारसे ज्ञान नव्हते. सोनियांचे शिक्षण इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात झाले आहे. या ठिकाणी जवळच एक Varsity नावाचं रेस्टॉरंट होते. याठिकाणी विद्यापीठाचे विद्यार्थी खाण्यापिण्यासाठी येत असत. या रेस्टॉरंटचे मालक चार्ल्स अँटनी हे राजीव गांधींचे खास मित्र होते आणि राजीव देखील या रेस्टॉरंटमध्ये अनेकदा जात असत. सोनिया-राजीव यांची पहिली भेटही याच रेस्टॉरंटमध्ये झाल्याचे बोलले जाते.

या रेस्टॉरंटचे मालक चार्ल्स अँटनी यांनी एकदा सांगितले की, एके दिवशी सोनिया एकट्याच येथे आल्या होत्या. दुपारच्या जेवणाची वेळ असल्याने रेस्टॉरंटमध्ये बसण्यास जागा नव्हती. त्याचवेळी राजीव गांधीदेखील एका गाल टेबलवर त्यांच्या मित्राची वाट बघत होते. बसण्यास जागा नसल्याने अँटोनीने म्हणजेच सोनियांनी राजीव यांना अनोळखी व्यक्तीसोबत बसलण्यास तुम्हाला काही अडचण नाही ना? त्यावर राजीव यांनी काहीच अडचण नसल्याचे सांगितले. इथूनच राजीव आणि सोनिया यांच्या प्रेमाला सुरूवात झाली.

अन् कुटुंब प्रेमापुढे झाले नतमस्तक

राजीव गांधी आणि सोनिया म्हणजेच अँटोनिया यांच्या प्रेमाची सुरुवात व्हर्सिटी रेस्टॉरंटमधूनच झाली. रोजच्या भेटींमुळे दोघांमधील प्रेम अधिकच घट्ट होत गेले आणि एके दिवशी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामान्यांप्रमाणे या दोघांच्याही प्रेमात अनेक चढ-उतार आले. लग्नासाठी जरी दोघे तयार असले तरी, राजीव आणि सोनियांच्या निर्णयात घरच्यांचा विरोध होता. मात्र, नंतर राजीव गांधी स्वतः सोनियांच्या वडिलांना भेटले आणि अखेर सोनिया आणि राजीव यांच्या लग्नाला होकार मिळाला.

बीग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी पार पडले लग्न आणि विधी

1968 मध्ये सोनिया गांधी पहिल्यांदा भारतात आल्या, तोपर्यंत त्यांचे राजीव यांच्यासोबत लग्न झाले नव्हते. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असल्याने सोनिया यांना घरात मुक्कामी ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळेच सोनियांना अमिताभ बच्चन यांच्या घरी थांबवण्यात आले होते.

अमिताभ आणि राजीव गांधी यांची मैत्री घट्ट होती, त्यामुळे अमिताभ यांनीही यासाठी नकार दिला नाही. यानंतर 13 जानेवारी 1968 रोजी सोनिया दिल्लीत पोहोचल्या आणि अमिताभ यांच्या घरी राहू लागल्या. इथेच त्यांना भारतातील चालीरीती जाणून घेण्याची संधी मिळाली. अमिताभ यांच्या घरी मेहेंदी सोहळा आणि लग्नही पार पडले. येथेच सोनिया राजीव यांच्या कुटुंबीयांना पहिल्यांदा भेटल्याचं सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

Latest Marathi News Live Update: बुधवारपर्यंत करार न झाल्यास इराणवर बॉम्बहल्ला करण्याची ट्रम्प यांची धमकी

SCROLL FOR NEXT