Former Congress president Sonia Gandhi faces a criminal complaint filed in Delhi’s Rouse Avenue Court, sparking political debates.

 

esakal

देश

Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

complaint against Sonia Gandhi in Delhi court : १० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार ; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण?

Mayur Ratnaparkhe

Legal Trouble for Former Congress President Sonia Gandhi : नॅशनल हेराल्ड प्रकरणात आधीच अडचणींचा सामना करत असणाऱ्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अडचणीत आता आखणी वाढ होवू शकते. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात त्यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की सोनिया गांधी यांना ३० एप्रिल १९८३ रोजी भारतीय नागरिकत्व मिळाले होते, परंतु त्याच्या तीन वर्षे आधी म्हणजेच १९८० मध्येच सोनिया गांधी यांचे नाव दिल्लीच्या मतदार यादीत नोंदले गेले होते. 

आता एक याचिका दाखल करण्यात आली आहे ज्यामध्ये असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की जेव्हा सोनिया गांधी भारतीय नागरिक नव्हत्या, तेव्हा त्यांचे नाव दिल्लीच्या मतदार यादीत कसे आले?  यासाठी बनावट कागदपत्रे वापरली जात होती का? या प्रकरणात सोनिया गांधींविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत अशी मागणी तक्रारदाराने न्यायालयाकडे केली आहे. 

या याचिकेवर १० सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही तक्रार राऊस अव्हेन्यू न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव चौरेसिया यांच्यासमोर दाखल करण्यात आली आहे. वकील विकास त्रिपाठी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवावा किंवा स्टेटस रिपोर्ट दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणातही कारवाई सुरू -

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींविरुद्ध न्यायालयीन कामकाज आधीच सुरू आहे. हा खटला मनी लाँड्रिंग आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपांशी संबंधित आहे, ज्यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने एप्रिल २०२५ मध्ये त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात, त्यांच्यावर आणि राहुल गांधींवर ९८८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि २००० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या मालमत्ता मिळवल्याचा आरोप आहे. हा खटला दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात प्रलंबित आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion : मुंबईत २४ रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना; फिरत्या वाहनाद्वारे विक्री

Nashik News : छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ

ODI World Cup सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार क्रिकेटर झाली संघाबाहेर; बदली खेळाडूचीही घोषणा

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

PM Modi Reaction on GST Reform : ‘’मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, की..’’ ; GST 'रिफॉर्म'वर मोदींची पहिली प्रतिक्रिया!

SCROLL FOR NEXT