sonia gandhi ner worth disclosed in affidavit filed for rajya sabha elections 
देश

Sonia Gandhi Property : 88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?

Sonia Gandhi Jewelry : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी राजस्थानमधून आगामी राज्यसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

रोहित कणसे

Sonia Gandhi Property Latest News : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी राजस्थानमधून आगामी राज्यसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तब्येतीच्या कारणामुळे या निवडणूकीत त्या रायबरेली येथील लोकसभा लढवणार नाहीत. पक्षांने त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान सोनिया गांधी यांच्या संपत्तीबद्दल माहिती समोर आली आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या एकूण संपत्ती १२.५३ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे ९०,००० रुपय रोकड देखील आहे. मागच्या काही वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये हळूहळू वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २०१४ साली त्यांची संपत्ती ९.२८ कोटी रुपये होती, जी २०१९ मध्ये वाढून ११.८२ कोटी झाली आणि २०२४ मध्ये ती अजून वाढली असून १२.५३ कोटी रुपये झाली आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत संपत्तीत तब्बल २७.५९ आणि २०१९ ते २०२४ पर्यंत तब्बल ५.८९ टक्के वाढ झाली आहे.

इटलीमध्ये देखील आहे संपत्ती...

आता राज्यसभा निवडणूकीसाठी भरलेल्या अर्जसोबत देण्यात आलेल्या एफिडेव्हिटमध्ये सोनिया गांधींनी इटली मध्ये आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये देखील आपला हिस्सा असल्याचे सागितले आहे. या संपत्तीची किंमत २६,८३,५९४ रुपये (२६.८३ लाख रुपये) आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी इटली येथील संपत्तीची किंमत १९.९ लाख रुपये होती. आता यामध्ये वाढ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी या प्रॉपर्टीची किंमत सांगितली नव्हती.

सोनं-चांदी किती?

सोनिया गांधी यांच्याकडे तब्बल ८८ किलो चांदी आणि १२६७ ग्रॅम सोनं आणि दागिने आहेत. तर २०१९ मध्ये सोनिया गांधी यांची दिल्लीच्या जवळ डेरामांडी गावात तीस गुंठे आणि महारौली येथे १२० गुठे जमीन होती. मात्र याबद्दल प्रतिज्ञापत्रात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. त्यांच्याकडे नवी दिल्लीच्या डेरामंडी गावात शेतजमीन आही ज्याची किंमत ५.८८ कोटी सांगण्यात आली आहे. तसेच सोनिया गांधी यांच्याकडे स्वतःची गाडी नाहीये.

सोनिया गांधी यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांचं कुठलंच सोशल मीडिया अकाउंट नाहीये. तसेच त्या फेसबूक, एक्स किंवा इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह नाहीत. सोनिया गांधी यांनी त्यांच्याविरोधातील पेंडिंग केसेचा उल्लेख देखील त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. ज्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकरणात दोषी ठरवले नसल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT