Sonia Gandhi Drupadi Murumu Sakal
देश

President Remark Row : सोनिया गांधींकडून काँग्रेस नेत्याची पाठराखण; म्हणाल्या, ''त्यांनी...''

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी उच्चारलेला शब्द देशासाठी घृणास्पद आणि संस्कृतीविरोधी असल्याचे भाजपने म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sonia Gandhi On President Remark Row : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'राष्ट्रपत्नी' म्हणून संबोधल्यानंतर गुरुवारी संसदेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेत्याने राष्ट्रपतींबाबत या शब्दाचा वापर केल्याने भाजप नेत्यांकडून या शब्दाचा तीव्र निषेध करण्यात आला. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या या शब्दप्रयोगावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर भाजप सदस्यांनी त्यांच्याकडे माफी मागावी अशी मागणी केली, त्याला त्यांनी साफ नकार देत चुकून एक शब्द उच्चारला गेल्याचे म्हणत त्यांनी माफी न मागण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर आता या वादावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी याप्रकरणी माफी मागितली असल्याचे काँग्रेसच्या हंगामी अध्याक्षा सोनिया गांधी म्हटले आहे.

भाजपकडून आक्रमक भूमिका

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी उच्चारलेला शब्द देशासाठी घृणास्पद आणि संस्कृतीविरोधी असल्याचे भाजपने म्हटले आहे. देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या आदिवासी महिलेच्या अपमानाबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया देत अधीर यांनी याप्रकरणी आधीच माफी मागितली असल्याचे म्हटले आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केली खंत

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी म्हणून संबोधित केले होते. तेव्हापासून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. तथापि, अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, आपल्या तोंडून चुकून एक शब्द बाहेर पडला. ज्याचा आपल्या खूप खेद असून, भाजपकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते या प्रकरणाचा राईचा पर्वत करत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT