Sonu Sood टिम ई सकाळ
देश

सोनू सूदचे मदतीचे पाऊल! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची केली सुटका

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी अभिनेता सोनू सूद मदतीला धावला

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशिया युद्धाने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक भारतीय या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत, अडकलेल्या भारतीयांना तसेत भारतीय विद्यार्थ्यांना तेथुन बाहेर काढणे, हे खुप मोठे आव्हान आहे. आता या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) पुन्हा मदतीला धावला आहे. याविषयी त्याने ट्वीट करत माहिती दिली.

सोनु सुद यांच्या मदतीने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. याबद्दल सोनू सुद यांनी ट्विटमध्ये म्हटले, “युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा कठीण काळ आहे. कदाचित माझे हे आतापर्यंतचे सर्वात कठीण काम आहे. सुदैवाने, आम्ही अनेक विद्यार्थ्यांना सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करू शकलो. आपण प्रयत्न करत राहू. त्यांना आपली गरज आहे.”

सोनू सूदने आपल्या ट्वीटमध्ये भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दूतावास यांनी दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभारही मानले. भारत सरकारने यापूर्वी भारत सरकारनी अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT