sonia and rahul gandhi 
देश

कॉंग्रेसचं ठरलं! अध्यक्षपदासाठी गांधी परिवाराबाहेरील 'या' नेत्याच्या नावाची शिफारस?

गांधी परिवाराकडून काँग्रेस अध्यक्षपद इतरांकडे सोपवण्यात येणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागल्यानंतर आता काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये गांधी परिवाराकडून काँग्रेस अध्यक्षपद इतरांकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चाही होती. त्याला आता काँग्रेसच्याच काही नेत्यांकडून दुजोरा मिळाला आहे. कारण G23 सदस्यांनी मुकुल वासनिक यांच्या नावाची काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिफारिस केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं म्हटलं आहे. (Source says G23 suggested Mukul Wasnik for Congress chief post)

पाच राज्यांमधील लाजीरवाण्या पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षातील पदांचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकलं होतं. त्यानंतर या चर्चेला अधिक जोर आला होता. या साऱ्या प्रकारानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काही तासांपूर्वी ट्विट करत यावर खुलासा केला होता.

सुरजेवाला यांनी म्हटलं होतं की, "काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेलं वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक आहे. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारं वृत्त दाखवणं हे चुकीचं आहे. एखाद्या टीव्ही चॅनेलने सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून काल्पनिक स्रोतांच्या आधारे अशाप्रकारच्या अप्रमाणित प्रचारकी बातम्या प्रसारित करणे अयोग्य आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT