Rahul Narwekar 
देश

Rahul Narwekar: राहुल नार्वेकर यांना दिल्लीत मोठी जबाबदारी; ओम प्रकाश बिर्ला यांनी केली घोषणा

Rahul Narwekar News: लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतर बदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतर बदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी दिली असल्याचं बोललं जात आहे. (speaker om birla announce committee under maharashtra legislative speaker rahul narwekar to review anti defection law)

बिर्ला ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, संसद सदस्यांची कार्यकुशलता वाढवण्यासाठी नियमितपणे राजकीय पक्षांची चर्चा आवश्यक असते. त्यांचे संरक्षक म्हणून पीठासीन अधिकाऱ्यांच्या काही जबाबदारी असतात. निर्णय असा घेतला जावा की पुढील पीढीला प्रेरणा मिळत राहील.

राहुल नार्वेकरच का?

राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर निर्णय दिला होता. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर कोणत्या गटाचे आमदार अपात्र आहेत, यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यायचा होता. दुसरीकडे, नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गट यावर सुनावणी करणार आहेत. यासंदर्भातील त्यांचा अभ्यास आणि अनुभव पाहता, त्यांची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

पक्षांतर बंदी कायदा काय आहे?

1967 मध्ये हरियाणाचे आमदार गया लाल यांनी एका दिवसात तीन पक्ष बदलले होते. त्यानंतर आया राम गया राम ही म्हण रुढ झाली. पद आणि सत्तेच्या मोहात पक्ष बदलण्याचा कृतीला थांबवण्यासाठी राजीव गांधी सरकारने १९८५ मध्ये पक्षांतर बंदी कायदा आणला. मर्जीप्रमाणे पक्ष बदलण्याच्या वृत्तीला यामुळे अटकाव झाला, तरी यामध्ये देखील अनेक पळवाटा काढण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT