Spelling Mistake in Ram Mandir Inauguration Invitation Card  Sakal
देश

Ram Mandir Invitation Card: राम मंदिर निमंत्रण पत्रिकेत गंभीर चूक; व्हिडीओ व्हायरल

Ram Mandir Inauguration Invitation Card: अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य श्री राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली असून आता पहिल्या निमंत्रण पत्राचे फोटो समोर आले आहेत.

राहुल शेळके

Ram Mandir Inauguration Invitation Card: अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य श्री राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली असून आता पहिल्या निमंत्रण पत्रिकेचे फोटो समोर आले आहेत.

अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो समोर आला आहे. मात्र या निमंत्रण पत्रिकेत एक चूक झाली आहे. त्यामुळे त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या निमंत्रण पत्रात इंग्रजीत चुकीचे Invitation लिहिले आहे.

एका युजरने लिहिले की, "तुमच्याकडे फक्त एक काम होते, वरवर पाहता ही "सभ्यतेच्या नवीन युगाची सुरुवात" आहे, परंतु साध्या गोष्टी देखील तुम्ही नीट करु शकत नाहीत.''

70 एकरात मंदिराचे बांधकाम सुरू

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी संपूर्ण मंदिराचा नकाशा सादर केला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, "मंदिर 70 एकर जागेच्या उत्तरेकडील भागात बांधले जात आहे. मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे.

तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस यांनी मंदिराच्या बांधकामाशी संबंधित इतर माहितीही सांगितली आहे. मंदिरात नृत्य, रंग, संमेलन, प्रार्थना आणि कीर्तन असे पाच मंडप असतील. मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी 32 पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराभोवती एक आयताकृती भिंत आहे, ज्याची लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट आहे.

उद्यानाच्या चारही कोपऱ्यांवर भगवान सूर्य, माँ भगवती, गणपती आणि भगवान शिव यांच्यासोबतच वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरेही बांधली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mexico Firing : फुटबॉल सामन्यावेळी बेछूट गोळीबार; ११ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी

पाकड्यांची मस्ती काही जात नाही! T20 World Cup स्पर्धेसाठी संघ जाहीर केला; तरी म्हणतात, आम्ही खेळूच असं नाही...

बापरे! मराठमोळ्या रिलस्टारचं निधन, प्रथमेश कदमच्या जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का, आई-मुलाची होती सुपरहिट जोडी

Chakur News : अपघाताने हिरावला हात, प्रेमाने दिली साथ; प्रीती कानवटे-दिनेश जाधव यांचा विवाह ठरतोय प्रेरणादायी

Latest Marathi news Update : उत्तराखंडने गैर-हिंदूंवरील बंदी वाढवली, गंगोत्री मंदिरात प्रवेश बंदी, बद्रीनाथ आणि केदारनाथसाठीही योजना

SCROLL FOR NEXT