SpiceJet Independence Day sale 2023 Sakal
देश

Flight Ticket Offer: स्वातंत्र्यदिनी स्वस्तात विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी! स्पाइसजेट देतयं स्पेशल ऑफर

SpiceJet Independence Day sale 2023: स्पाईसजेटचा सेल आजपासून सुरू झाला आहे.

राहुल शेळके

SpiceJet Independence Day sale 2023: विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन कंपनीपैकी एक असलेल्या स्पाइसजेटने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.

ऑफर अंतर्गत, प्रवाशांना 1,515 रुपयांमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कंपनीने स्पेशल इनक्रेडिबल इंडिपेंडन्स डे सेल अंतर्गत याची घोषणा केली आहे. स्पाईसजेटचा सेल आजपासून सुरू झाला आहे आणि 20 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

काय आहे ऑफर?

1,515 रुपयांच्या फ्लाइट तिकिटांव्यतिरिक्त, स्पाइसजेट 2,000 रुपयांपर्यंतचे मोफत फ्लाइट व्हाउचर देखील देत आहे. याशिवाय, एअरलाइन कंपनी पसंतीचे सीट निवडण्याची संधी देखील देत आहे. 20 ऑगस्टपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

'या' ठिकाणांना भेट देऊ शकता

मुंबई-गोवा, जम्मू-श्रीनगर, गोवा-मुंबई, गुवाहाटी-बागडोगरा, चेन्नई-हैदराबाद यासारख्या लोकप्रिय देशांतर्गत मार्गांवर 1,515 रुपयांची एकेरी विमान प्रवास ऑफर मिळू शकते.

ही ऑफर थेट देशांतर्गत बुकिंगवर आहे. या ऑफर अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिलेली सीट देखील उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हा फायदा ग्रुप बुकिंगमध्ये मिळणार नाही आणि तो इतर कोणत्याही ऑफरसोबत जोडला जाऊ शकत नाही.

2,000 रुपयांचे व्हाउचर दिले जाईल

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सेल संपल्यानंतर, सात दिवसांच्या आत बुकिंग केल्यावर ग्राहकांना 2,000 रुपयांपर्यंतचे मोफत फ्लाइट व्हाउचर मिळतील.

तसेच, प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा तत्त्वावर 15 रुपयांमध्ये पसंतीचे सीट निवडण्याची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर स्पाइसजेटच्या नेटवर्कवर उपलब्ध आहे. यामध्ये वेबसाइट, एम-साइट, मोबाइल अॅप, आणि निवडक ट्रॅव्हल एजंट यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT