Rising Sprinter of India
Rising Sprinter of India 
देश

भारताच्या 'उसेन बोल्ट'वर क्रीडामंत्री झाले फिदा (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

भोपाळ : जगातील सर्वात वेगवान माणूस म्हणून जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला ओळखले जाते. मात्र, त्याला टक्कर देणारा भारताचा उसेन बोल्ट तुम्ही पाहिला आहे का? मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील एका तरुण धावपटूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा तरूण अनवाणी पायांनीसुद्धा 100 मीटर इतके अंतर अवघ्या 11 सेकंदांमध्ये पूर्ण करण्याची कमाल करून दाखवत आहे. या तरूणाचे नाव रामेश्वर गुर्जर असून त्याचा हा व्हिडीओ भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरून पोस्ट केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओची दखल केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी घेतली आहे.  

शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना ट्विटरवर टॅग केले असून या तरुणाला योग्य संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर खुद्द क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनाही या भारतीय धावपटूची भुरळ पडली. या तरुणाला कोणीतरी माझ्याकडे घेऊन या. देशाच्या अॅथलिट अॅकॅडमीमध्ये मी त्याची व्यवस्था करेन, असे प्रत्युत्तर रिजीजू यांनी चौहान यांच्या ट्विटला दिले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशचे क्रीडामंत्री जीतू पटवारी यांनीदेखील रामेश्वरला भोपाळमध्ये उत्तम प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. या उभरत्या धावपटूला योग्य सुविधा, दर्जेदार बूट आणि चांगले प्रशिक्षण मिळाले, तर तो 100 मीटर अंतर केवळ नऊ सेकंदांमध्ये पूर्ण करु शकतो, असा विश्वास पटवारी यांनी व्यक्त केला आहे.

रामेश्वर गुर्जरने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्याच्या कुटुंबात आई-वडिल आणि पाच भावंडे असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांनी त्याची तुलना जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टशी केली आहे. हा भारताचा उसेन बोल्ट होऊ शकतो, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

या तरूण धावपटूला योग्य प्रशिक्षण द्यावे. तसेच रामेश्वरसारख्या अनेक खेळाडूंना संधी दिल्यास ते देशाचे नाव जागतिक स्तरावर नक्कीच उमटवू शकतील, अशी मागणी नेटकरी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT