Jammu and Kashmir Indian Army esakal
देश

Sopore Encounter : सोपोरमध्ये जोरदार चकमक; जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

या गोळीबारात एका गावकऱ्यालाही गोळी लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

या गोळीबारात एका गावकऱ्यालाही गोळी लागली आहे.

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील सोपोर (Sopore Kashmir) इथं बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यापैकी एक विदेशी आहे. अंधाराचा फायदा घेत त्याचे साथीदार पळून गेले, त्यांचा शोध सुरू आहे.

या गोळीबारात एका गावकऱ्यालाही गोळी लागली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमॅटिक शस्त्रांनी सज्ज दहशतवाद्यांचा एक गट त्यांच्या संपर्कातील एकाला भेटण्यासाठी सोपोरमधील बोम्मई इथं पोहोचला होता. लष्कराच्या 22 आरआर आणि सीआरपीएफच्या जवानांसह पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन केलं. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास सुरक्षा दलांनी (Indian Army) गावाला वेढा घातला आणि शोध सुरू केला.

एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. काही वेळानं दुसरा दहशतवादीही मारला गेला. दरम्यान, अली मोहम्मद गनई या गावकऱ्याच्या पायाला गोळी लागलीय. जवानांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरलंय. रात्री उशिरापर्यंत गोळीबार सुरू होता. मंगळवारी देखील दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत लष्कर-ए-तौयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. ठार झालेले तीनही दहशतवादी स्थानिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT