Suvarna Soudha Belgaum Basavaraj Horatti esakal
देश

सुवर्णसौधमुळं बेळगाव सीमाप्रश्‍न संपुष्टात; विधान परिषदेच्या अध्यक्षांनी लावला जावईशोध, म. ए. समिती संपल्याचंही केलं वक्तव्य

मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने लढा देत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून म. ए. समिती विरोधात गरळ ओकत आहेत.

बेळगाव : बेळगावात सुवर्ण विधानसौध (Suvarna Soudha Belgaum) निर्माण करण्यात आल्यामुळे सीमाप्रश्‍न संपुष्टात आल्याचा जावईशोध राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी (Basavaraj Horatti) यांनी लावला आहे. डिसेंबर महिन्यात सुवर्ण विधानसौध होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी बसवराज होरट्टी यांनी मंगळवारी सुवर्ण विधानसौधला भेट दिली.

तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना होरट्टी यांनी सुवर्ण विधानसौध आणि हिवाळी अधिवेशनामुळे समिती आणि सीमालढ्याचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे वक्तव्य केले आहे.

भाषावार प्रांतरचना झाल्यापासून मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने लढा देत आहे. धजदचे नेते आणि एच. डी. कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात बेळगावात सुवर्ण विधानसौध उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले. बेळगाव येथे सुवर्ण विकाससौध बांधल्याचा हेतू यशस्वी झाला आहे.

तसेच बेळगाव सीमाभाग हा कर्नाटकाचाच असल्याचे सिद्ध झाले आहे, असे सांगत होरट्टी यांनी मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही होरट्टी यांनी मराठी भाषिक आणि म. ए. समितीच्या विरोधात अनेकदा विधाने केली आहेत. मात्र, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत म. ए. समितीचा लढा कायम सुरू राहणार आहे, असे मत होरट्टी यांच्या विधानानंतर समिती कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

मराठी शाळांविरोधातही वक्तव्य

यापूर्वी शिक्षणमंत्री असतानादेखील होरट्टी यांनी मराठी शाळांविरोधात वक्तव्य केले होते. तसेच अगोदर कन्नड शहारांचा विकास करा, नंतर इतर माध्यमांचा विचार करा, असे मत व्यक्त केल्यामुळेही गोंधळ निर्माण झाला होता.

कर्नाटकातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून म. ए. समिती विरोधात गरळ ओकतात, मात्र मराठी भाषिकांनी आपला लढा कायम ठेवला आहे, हे कर्नाटकाने ध्यानात घेतले पाहिजे. कोणी काही बोलले म्हणून सीमालढा संपत नाही. मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कांसाठी लढा सुरूच ठेवतील.

-मालोजी अष्टेकर, सरचिटणीस, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT