Vaccine Sakal
देश

शिक्षकदिनाच्या आधी अधिकाधिक शिक्षकांचं व्हावं लसीकरण; केंद्राची सूचना

विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाची गती वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून लसीचे अतिरिक्त डोस उपलब्ध करुन दिले जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. मांडविय यांनी राज्यांना विनंती केली आहे की, त्यांनी ५ सप्टेंबरच्या आधी म्हणजेच शिक्षक दिनाच्या आधी सर्व शाळांच्या सर्व शिक्षकांचं लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 25 ऑगस्टच्या सकाळपर्यंत देशात 59.55 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

या महिन्यात प्रत्येक राज्याला अतिरिक्त दोन कोटीहून अधिक डोस उपलब्ध करुन दिले जात आहेत. आम्ही सगळ्या राज्यांना अशी विनंती केली आहे की, त्यांनी ५ सप्टेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिक्षक दिनाच्या आधीच सर्व शाळांच्या शिक्षकांना प्राथमिकता देऊन त्यांचं लसीकरण प्राधान्याने करण्यावर भर द्यावा.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत आज देशातील लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेची दखल यात घेण्यात आली. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना २७ ते ३१ ऑगस्ट या काळात दोन कोटी जादा डोस वितरित करण्यात येणार आहेत. त्याचा वापर प्रामुख्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राधान्याने करायचा आहे, अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Kolhapur : मिशन जिल्हापरिषद! कार्यकर्ता नाही वारदार महत्वाचा, कोल्हापुरात नेत्यांकडून मुलगा, सून, पुतण्या, रिंगणात उतरवण्याच्या तयारीत

Virat Kohli: भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विराट कोहलीचे उत्तर, बरंच काही बोलून गेला! पाहा शास्त्री-गिलख्रिस्टने घेतलेली मुलाखत Video

Maharashtra Politics: ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा चर्चा! भाजपने शिंदे सेनेला डिवचले, महायुतीमध्ये संघर्ष वाढला

Latest Marathi News Live Update : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

SCROLL FOR NEXT