Mangalore Crime esakal
देश

Mangalore Crime : समाजकंटकांकडून प्रार्थनास्थळावर तुफान दगडफेक, खिडक्यांच्या फोडल्या काचा; सहा जणांना अटक

Mangalore City Police : पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी निरीक्षक महेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

संशयित आरोपींना सोमवारी सकाळी कादरी मंजुनाथ मंदिर रोडजवळ अटक करण्यात आलीये.

बंगळूर : मंगळूर शहर पोलिसांनी (Mangalore City Police) रविवारी रात्री शहराच्या बाहेरील सुरतकल्ल येथील प्रार्थनास्थळावर दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सहा जणांना अटक केली. भरत शेट्टी (वय २६, रा. कनकटला, सुरतकल), चेन्नप्पा शिवानंद चालवादी (१९), नितीन हडपाडा (२२, रा. कनकटला, सुरतकल), सुजित शेट्टी (२३, रा. चेलारू, सुरतकल), अण्णाप्पा (२४), होसबेट्टू गावातील प्रीतम शेट्टी (३४) यांना अटक करण्यात आली आहे.

कटिपल्लाच्या ३ रा ब्लॉकमधील प्रार्थनास्थळाच्या अध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री साडेनऊच्या सुमारास दोन दुचाकींवर आलेल्या समाजकंटकांनी प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. या घटनेत खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या असल्याचा आरोप होत आहे.

पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी निरीक्षक महेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले आहे. संशयित आरोपींना सोमवारी सकाळी कादरी मंजुनाथ मंदिर रोडजवळ अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी मोटार, दोन दुचाकी आणि चार मोबाईल फोन जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर एक स्टार रिव्ह्यू; कंपनीने महिलेवरच दाखल केला मानहानीचा दावा... काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi Shirt Shoes Brand : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शर्ट-शूजची चर्चा; ब्रँड कोणता, किंमत किती? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'तो' मुंबईला येतोय, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळा रचला अन्...; अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला अटक

Humanoid Robot 100m Record : चिनी रोबोटने मोडला उसैन बोल्टचा जागतिक विक्रम; १०० मीटर अंतर अवघ्या ९.३९ सेकंदांत केले पार, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : कापूरहोळमध्ये रास्ता रोको, पुणे- बेंगलुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT