देश

कानपूरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; सहाजण ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

कानपूर : भाजप नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेक्षित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, या घटनेत काहीजण जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान, अशा प्रकारचा हिंसाचार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी काही स्थानिकांवर लाठीचार्ज केल्यानंतर यतीमखानाजवळील बेकनगंज भागात दोन गटांत हिंसाचाराला तोंड फुटले त्यानंतर दोन्ही समाजातील गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. (Stone Platting In Kanpur )

दरम्यान, शर्मा यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी आज कानपूरमधील मुस्लिमबहुल भागातील व्यवसाय आज बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलीस संरक्षणात नमाज अदा करण्यात आली. यानंतर यतिमखाना येथील सद्भावना चौकीजवळ दोन्ही समाजातील जमाव एकत्र आला. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही समाजातील गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली.

शर्मा यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी जोहर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी मुस्लिम समाजाला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हिरामण पूर्वा, दलेल पूर्वा, मेस्टन रोड, बाबू पूर्वा, रावतपूर आणि जाजमाऊ या भागातील दुकाने आंशिक किंवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, दुपारच्या नमाज पठानानंतर अचानक मोठा जमाव एकत्र आला आणि त्यानंतर परिस्थीती बिघडत गेली.

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी 27 मे रोजी एका कार्यक्रमात प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर हा हिंसाचार उसळून आला आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT