Director Vivek Agnihotri esakal
देश

फुकटात 'काश्मिर फाईल्स' दाखवू नका; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचं आवाहन

ट्विटद्वारे भाजप नेत्यांना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यावरुन सुनावलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : 'दि काश्मीर फाईल्स' हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये तुफान चालला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भाजपनं खास कंबर कसली आहे. विविध ठिकाणी भाजपकडून लोकांना मोफत आणि सवलतीमध्ये हा चित्रपट दाखवला जात आहे. पण भाजपच्या या भूमिकेवर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आक्षेप घेतला आहे. भाजप नेत्यांना फुकटात सिनेमा दाखवणं थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Stop showing free screening Kashmiri files movie to BJP leaders says Vivek Agnihotri)

अग्निहोत्री यांनी ट्विटद्वारे म्हटलं की, हरयाणातील रेवारी इथं भाजपच्या नेत्यांनी काश्मिर फाईल्स या सिनेमाचं मोफत शो आयोजित केला होता. पण ही बाब दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना रुचली नाही. त्यांनी म्हटलं की, लोकांना फुकटात सिनेमा दाखवणं हा फौजदारी गुन्हा आहे. यासाठी त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी हे थांबवावं. राजकीय लोकांनी कलात्मक व्यावसायाची कदर करावी. त्यासाठी कायदेशीररित्या आणि शांततेत सिनेमाचं तिकिट विकत घेऊन तो सिनेमागृहात जाऊन पाहावा, हीच खरी देशभक्ती आणि सामाजिक कार्य आहे.

अग्निहोत्री यांच्या ट्विटला उत्तर देताना हरयाणा भाजपचे प्रभारी अरुण यादव यांनी म्हटलं की, आपण संबंधीत भाजप नेत्यांना याबाबत सांगितलं असून अशा प्रकारे मोफत स्क्रिनिंग थांबवण्यास सांगितलं आहे. तसेच ज्यांना हा सिनेमा पहायचा असेल त्यांनी तो सिनेमागृहात जाऊन पाहावा असंही त्यांनी सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, काश्मिर फाईल्स हा सिनेमा नव्वदच्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या विस्थापन घटनेवर आधारित आहे. या पिंडितांना दहशतवाद्यांच्या भीतीपोटी आपली राहती घरं सोडून काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडावं लागलं होतं. या सर्व तत्कालिन घडामोडींचं चित्रण या सिनेमामध्ये करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT