mid-day meal scheme Sakal
देश

Mid Day Meal: सरकारी शाळेत लसीकरण अन् मध्यान्ह भोजनं; जेवणानतंर दुसरीतल्या विद्यार्थ्यीनीचा मृत्यू!

त्याचबरोबर इतर चार चिमुकल्यांची प्रकृती गंभीर आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कानपूर : एका सरकारी शाळेत लसीकरणानंतर एका दुसरीतल्या विद्यार्थ्यीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे. लसीकरणानंतर शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन खाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला.

उत्तर प्रदेशातील कानपूर इथल्या शाळेत हा प्रकार घडला. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. सर्वात वाईट म्हणजे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले असून आरोग्य विभागानं लसीकरणामुळं विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा इन्कार केला आहे. (Student death of 2nd class student after taking vaccination and mid day meal in govt school)

बोडेपुरवा नामक गावात राहणाऱ्या कर्नल सिंह कमल या रोजंदारीच काम करणाऱ्या व्यक्तीची ७ वर्षांची मुलगी आयुषी कमल ही चंदुला इथं प्राथमिक शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होती. तिच्याबाबतीत ही दुर्घटना घडली आहे. (Marathi Tajya Batmya)

या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, शाळेत होत असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत डांग्या खोकल्याची लस दिली गेली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आयुषीनं शाळेत मिळणारं मध्यान्ह भोजन घेतलं. जेवणाचं ताट धुण्यासाठी ती शाळेच्या आवारातील हापशावर ताट धुवत असताना ती अचानक कोसळली आणि बेशुद्ध झाली. अमर उजालानं याबाबत वृत्त दिलं आहे.

मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर प्राचार्यांनी घरी सोडलं

या मुलीला अंगात खूपच ताप भरल्यानंतर प्राचार्य मनोज कुमार यांनी तिला एक पॅरासिटामोलची गोळी दिली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्राचाऱ्यांनी मनोज कुमार यांनी आयुषीला आपल्या बाईकवरुन तिच्या घरी सोडलं. त्याचवेळी आणखी चार विद्यार्थीनींची प्रकृती देखील बिघडली.

यामध्ये हर्षिता कमल (वय ६), राधा (वय ७), खुशी (वय ६) आणि अंश (वय ७) यांचा समावेश होता. यातील हर्षिता हीला एका खासगी रुग्णालयात उपचांरासाठी दाखल केलं. तर इतरांवर घरीच उपचार सुरु आहे.

प्रकृती अधिकचं बिघडल्यानं आरुषीच्या पालकांनी तिला घराजवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेलं. पण तरीही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं संध्याकाळी ५ वाजता तिला दुसऱ्या दवाखान्यात हालवण्याचा सल्ला देण्यात आला. पण तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रस्त्यातच आरुषीनं शेवटचा श्वास घेतला. (Latest Marathi News)

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

दरम्यान, चीफ मेडिकल ऑफिसर अलोक रंजन यांनी सांगितलं की, लशीमुळं मृत्यू होत नाही. परंतू सकाळी टीमला पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

शिक्षणाधिकाऱ्यांना माहितीच नाही

शिक्षणाधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती विचारली असता आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं उत्तर त्यांनी दिलं. शाळेतच अशी घटना घडली आहे तर शाळेचे प्राचार्य आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी मला कळवायला हवं. पण त्यांनी असं का केलं यासाठी त्यांना कारणेदाखवा नोटीस पाठवण्यात येईल, असं जिल्हा शिक्षणाधिकारी सुरजीतकुमार सिंह यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT