rape 
देश

हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

वॉचमनच्या खोलीत आरोपींनी बलात्काराचे कृत्य केले.

दीनानाथ परब

हैदराबाद: महिला सुरक्षेसाठी (women safety) कठोर कायदे करुनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत. एका हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत (abandoned hospital building )विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (rape) झाला आहे. तेलंगणच्या (Telangana) निझामाबाद जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहभाग असल्यामुळे पाचही आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आयपीसीच्या विविध कलमांतंर्गत आरोपींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. अन्य दोन आरोपी त्यांचे साथीदार होते. मंगळवारी रात्री विद्यार्थिनी घरी परतत असताना, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपी तिला निर्जन स्थळी घेऊन गेले.

एका आरोपी बरोबर मैत्री झाल्यानंतर पीडीत मुलगी त्याच्या बाईकवर बसली. ड्राइव्हसाठी जात असल्याचे सांगून ते तिला निझामाबाद येथे घेऊन गेले. आरोपी पीडीत मुलीला एका हॉस्पिटलच्या पडक्या इमारतीत घेऊन गेले व तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.

वॉचमनच्या खोलीत आरोपींनी बलात्काराचे कृत्य केले. तीन आरोपींनी हे कृत्य केले. अन्य दोघेजण तिथे हजर होते. सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT