Students celebrate freedom of uniform sakal
देश

गणवेश स्वातंत्र्याचा विद्यार्थिनींकडून जल्लोष

केरळमधील सरकारी शाळेचे लिंगभेदभावाविरोधात पाऊल; मुस्लिम समाजाचा विरोध मागे

अजय कुमार

तिरुअनंतपुरम: देशात मुलींचे लग्नाचे वय २१ करण्यावर चर्चा सुरू असताना केरळमध्ये शाळांमध्ये मुलामुलींसाठी समान गणवेश (Similar uniforms for boys and girls in schools)लागू करून स्त्री-पुरुष समानतेकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्य सरकारच्या या योजनेला मोठा पाठिंबा मिळत असून ज्या देशांमध्ये केरळी शाळा आहेत, तेथेही समान गणवेशाला समर्थन मिळत आहे.

कोझिकोडमधील बालूसेरी गावातील मुलींच्या उच्च माध्यमिक सरकारी शाळेत विद्यार्थ्‍यांप्रमाणे गणवेश घालण्यास विद्यार्थिनींना परवानगी दिली. अशा प्रकारे मुलींना जास्त स्वातंत्र्य दिले जात असल्याचा दावा करीत काही कट्टर मुस्लीम संघटनांनी शाळेबाहेर आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. पण गणवेश स्वातंत्र्याबद्दल विद्यार्थिनींनी जल्लोष करून आनंद व्यक्त केल्‍यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या बुधवारपासून (ता.१५) शाळेत समान गणवेशाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्याच्या उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी या योजनेचे उद्‍घाटन केले.

कोझिकोड जिल्ह्यातील मलाबार या मुस्लिम बहुल प्रदेशात प्रदेशात बाल विवाहांचे मोठे आहे. या समाजातील मुलींवर पोशाख, वागणुकीसंबंधी आणि अन्य सामाजिक बंधने आहेत. यातून समान गणवेशाला काही कट्टर मुस्लिम संघटनांनी सुरुवातीला विरोध केला होता. नंतर तो कमी झाला, पण मुलींचे लग्नाचे वय बदलण्यास मात्र त्यांचा विरोध आहे.

‘पँट व शर्ट घालणे आरामदायी’

‘‘गणवेशातील हा बदल सुखद आहे. मुलांना गणवेश स्वातंत्र्य असल्याचा हेवा वाटत असे, पण आता सर्व एकसारखेच असून मुले-ंमुली समानतेची आठवण यानिमित्त समाजाला करून देता येईल, अशी भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली. मुलांप्रमाणे शाळेत पँट व शर्ट घालणे हे अधिक आरामदायी असून यामुळे मुलांपेक्षा आपण वेगळे आहोत असे वाटत नाही व लिंगभेदभावही जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

केरळ सरकारकडून जनजागृती

समान गणवेशाची संकल्पना केरळमध्ये नवीन नाही. यापूर्वी इडुक्की जिल्ह्यातील शांतीग्राममधील इंग्रजी माध्यम शाळेत विद्यार्थी व विद्यार्थींनींसाठी गेल्या ११ वर्षांपासून एकसमान गणवेश आहे. समान गणवेश धोरणाला केरळ सरकार प्रोत्साहन व समर्थन देत आहे. याबाबत शिक्षण मंत्री शिवकुट्टी म्हणाले की, ही योजना राज्यातील सर्व शाळांमध्ये सरसकट लागू करण्यात येणार नाही, पण आम्ही या कल्पनेसाठी जनजागृती करू. पालक व शिक्षक संघटना याबाबत जी भूमिका घेतील, त्‍याला आमचा पाठिंबा असेल.

परदेशातही स्वागत

समान गणवेशाच्या केरळ सरकारच्या योजनेचे स्वागत पुरोगामी विचारांच्या महिलांकडून स्वागत होत असून विदेशात केरळी समाजाने सुरू केलेल्या शाळांनीही त्‍याला पाठिंबा दर्शविला आहे. नव्या पिढीत महिला समानतेची बीजे रुजण्यासाठी ही योजना तेथील शाळांमध्ये लागू करण्याच्यादृष्टीने पालक सभांचे आयोजन केले आहे, असे सांगण्यात आले.

लैंगिक न्याय आणि समानतेच्या युगाची जगात सुरुवात होत असताना बालुसेरी येथील मुलींच्या सरकारी शाळेने समान गणवेश लागू करून क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. अशा योजनांना जे लोक विरोध करीत आहेत, ते केरळ आणि त्यांच्या भावी पिढ्यांच्या हिताविरोधात काम करीत आहे.

- आर. बिंदू, उच्च शिक्षण मंत्री, केरळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT