नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याइतके ट्विटर फॉलोअर्स (PM Modi Twitter Followers) भारतात कोणाचेही नाहीत. मोदींचे ७७.८ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स आहेत. तसेच विरोधक राहुल गांधी हे मोदींच्या तुलनेत २०.४ दशलक्ष फॉलोअर्सने मागे आहेत. मोदींची फॉलोअर्सची संख्या चौपट असूनही राहुल गांधींना लाइक्स, रिट्विटस आणि कोट्स रिट्विट मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. राहुल गांधींना मोदींच्या तुलनेत ट्विटरवर तिप्पट प्रतिसाद मिळला. गेल्या २०१९ -२१ मधील ट्विटवरून केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ORF) ने गेल्या महिन्यात ‘सोशल मीडिया अँड पॉलिटिकल लीडर्स : अॅन एक्सप्लोरेटरी अॅनालिसिस’ हा शोधनिंबंध प्रकाशित केला. शमिका रवी आणि मुदित कपूर यांनी २०१९-२१ मध्ये मोदी आणि राहुल गांधी यांच्या ट्विटर फॉलोअर्स आणि त्यांचा प्रतिसाद याचा अभ्यास करून हे शोधनिबंध तयार केले आहेत. या कालावधीत राहुल गांधींनी दिवसाला सरासरी 1.7 ट्विट केले. यापैकी 49 टक्के ट्विट हिंदीत होते. तर मोदींनी दररोज सुमारे 8 ट्विट केलेय. त्यापैकी सुमारे 72 टक्के ट्विट इंग्रजीत होते. तसेच गांधींनी मोदींपेक्षा अधिक "नकारात्मक" ट्विट देखील पोस्ट केले. या ट्विटला जास्त फॉलोअर्सने रिट्विट केले होते.
विश्लेषण कसं केलं? -
मोदी आणि गाधींनी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ मध्ये केलेल्या ट्विट्चा रिट्विट वगळून अभ्यास करण्यात आला. यावेळी सकारात्मक, नकारात्मक आणि तटस्थ अशा प्रकारचे ट्विट केलेले आढळून आले. तसेच फक्त सांख्यिकीय अभ्यास न करता ट्विटरच्या नवीन धोरणाचा दोन्ही नेत्यांच्या ट्विटर प्रतिसादावर कसा परिणाम झाला? याचा देखील अभ्यास यामध्ये करण्यात आला.
विशेष म्हणजे, 2019-21 मध्ये राहुल गांधींना ट्विटरवर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी कोरोना व्यवस्थापन, स्थलातंरीत कामगारांचं संकट, शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका केली होती. या ट्विटला सर्वोत्तम प्रतिसाद मिळाला. पण, ट्विटरच्या बदलेल्या धोरणाचा त्यांना मोदींपेक्षा जास्त फटका बसला.
राहुल गाधींना जास्त प्रतिसाद -
राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी या दोन्ही नेत्यांनी २०१९ ते २१ या कालावधीत एकूण ११,३१२ ट्विट केले. यापैकी १६ टक्के ट्विट हे गांधी, तर ८४ टक्के ट्विट मोदींचे आहेत. राहुल गांधींना मोदींपेक्षा ट्विटरवर अधिक प्रतिसाद मिळाला. राहुल गांधींच्या ट्विटला जवळपास 10,034 रिट्विट्स आणि 43,455 लाईक्स मिळाले, तर मोदींच्या 4,554 रिट्विट्स आणि 28,095 लाइक्स मिळाले. दोन्ही नेत्यांनी कशा प्रकारचे ट्विट्स केले यावर ते अवलंबून होतं. कारण, संशोधकांनी सर्वाधिक नकारात्मक आणि सर्वाधिक सकारात्मक अशा ट्विटची देखील तुलना केली. यामध्ये राहुल गांधींचे ट्विट सर्वाधिक नकारात्मक होते.
ट्विटर धोरणातील बदलाचा मोदींपेक्षा गांधींवर परिणाम -
ऑक्टोबर 2020 मध्ये, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी, ट्विटरने धोरण बदलले. चुकीची माहिती पसरू नये यासाठी ट्विटरने नियम अधिक कडक केले. या धोरणाचा मोदी आणि गांधी दोन्ही नेत्यांना फटका बसला. पण, सर्वाधिक नुकसान राहुल गाधींचे झाले. राहुल गांधींच्या ट्विटला मिळत असलेला प्रतिसाद 65,123 वरून 44,880 पर्यंत खाली घसरला, तर मोदींच्या ट्विट्सवरील प्रतिसाद १३ टक्क्याने कमी झालेला आढळून आला. मोदींचे कोट ट्विट प्रत्यक्षात ५० टक्क्यांनी वाढले, तर गांधींचे ट्विट ३८ टक्क्यांनी घसरले.
धोरणात बदल झाल्यानंतर मोदींच्या नकारात्मक ट्विटला ३ टक्के कमी प्रतिसाद मिळाला. पण, त्यांच्या सकारात्मक ट्विटला भन्नाट रिट्विट्स मिळाले. दुसरीकडे राहुल गांधींच्या नकारात्मक ट्विटचा प्रतिसाद वेगानं कमी झाला. हे सर्व ट्विटरने धोरणात बदल केल्यानंतर झाल्याचे आढळून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.