suicide Report Latest News suicide Report Latest News
देश

देशात दररोज होतात इतक्या आत्महत्या; महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर? NCRB चा अहवाल

एनसीआरबीने अहवालात आत्महत्येचे कारण सांगितले आहे

सकाळ डिजिटल टीम

suicide Report Latest News नवी दिल्ली : देशातील आत्महत्यांची (suicide) संख्या सातत्याने वाढत आहे. ‘२०२१ मध्ये देशभरात १.६४ लाखांहून अधिक लोकांनी स्वतःचा जीव घेतला. हा आकडा २०२० च्या तुलनेत ७.२ टक्के अधिक आहे. २०२० मध्ये १.५३ लाख लोकांनी आत्महत्या केल्या होत्या’ असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या (NCRB) अहवालात म्हटले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO) जगात दरवर्षी सात लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात. तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या यापेक्षा जास्त आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते १५ ते २९ वयोगटातील युवकांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे चौथे प्रमुख कारण आहे. भारतातच आत्महत्यांचे (suicide) प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे.

गेल्यावर्षी १ लाख ६४ हजार ३३ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. म्हणजेच दररोज ४५० मृत्यू आत्महत्यांमुळे होत होते. एनसीआरबीनुसार २०१७ मध्ये १.२९ लाख लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच २०१७ ते २०२१ पर्यंत आत्महत्यांच्या संख्येत २६ टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण वेगळे असते. नैराश्य, तणावामुळे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कधीकधी वैद्यकीय कारण देखील असते. याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीला संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो तेव्हा तो आत्महत्या करतो.

एनसीआरबीने (NCRB) अहवालात आत्महत्येचे कारण सांगितले आहे. त्यानुसार कौटुंबिक समस्या आणि आजारांमुळे लोक सर्वाधिक आत्महत्या करतात. गेल्या वर्षी ३३ टक्के आत्महत्या कौटुंबिक समस्यांमुळे आणि १९ टक्के आजारपणामुळे झाल्या.

अहवालाबद्दल मोठ्या गोष्टी

  • देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (Maharashtra) होतात. मागच्या वर्षी महाराष्ट्रात २२,२०७ जणांनी आत्महत्या केल्या होत्या.

  • यानंतर तामिळनाडूमध्ये १८,९२५ आणि मध्य प्रदेशात १४,९६५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. दिल्लीत २,८४० लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.

  • १८ ते ३० वयोगटातील ५६,५४३ तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचवेळी ३० ते ४५ वयोगटातील ५२,०५४ आणि ४५ ते ६० वयोगटातील ३०,१६३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. १८ वर्षांखालील १०,७३२ लोकांनी आत्महत्या केल्या होत्या.

  • आत्महत्यांपैकी ६४ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी होते. तसेच ३२ टक्के लोक असे होते ज्यांची कमाई वर्षाला १ ते ५ लाखांपर्यंत होती.

  • आत्महत्या करणाऱ्यांपैकी २५ चक्के पेक्षा जास्त लोक रोजंदारीवर काम करायचे. १४ टक्के पेक्षा जास्त गृहिणी होत्या. १२ टक्के पेक्षा जास्त लोकांचा व्यवसाय होता तर ८.४ टक्के बेरोजगार होते.

  • आत्महत्यांपैकी २४ टक्के दहावी किंवा बारावी पर्यंत शिकलेले होते. तर ११ टक्के निरक्षर होते. पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले फक्त ४.६ टक्के होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2030 Commonwealth Games : २०३०च्या 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा'बाबत मोठी अपडेट!, यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस

Pakistan Afghanistan: काबूलवर पाकिस्तानचा बॉम्बवर्षाव, अफगाणिस्तानकडून ड्रोन हल्ला; तणाव वाढण्याची शक्यता

T20 World Cup 2026: नेपाळ-ओमान वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार! १९ संघ ठरले, आता उरली एक जागा

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये टॉप लीडरसह तब्बल १०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण?

Latest Marathi News Live Update : सर्वोच्च न्यायाधीशांवरील हल्ल्याचा स्वाक्षरी आंदोलनाने निषेध

SCROLL FOR NEXT