Uttar Pradesh Crime News esakal
देश

डीआयजींकडं दाद मागितली, पण..; घरी कोणी नसताना बलात्कार पीडितेनं लावून घेतला गळफास

बलात्कार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं तिनं आत्महत्येचं पाऊल उचललंय.

सकाळ डिजिटल टीम

बलात्कार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं तिनं आत्महत्येचं पाऊल उचललंय.

उत्तर प्रदेश : संभल (Sambhal Uttar Pradesh) येथील एका अल्पवयीन सामूहिक बलात्कार पीडितेनं आरोपींवर कारवाई न झाल्यानं आत्महत्या केलीय. बलात्कार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं. पीडितेनं सीओ ते डीआयजी यांच्याकडं कारवाईची विनंती केली. मात्र, कारवाई करण्याऐवजी पोलिस तिच्यावर दबाव आणत होते.

हे प्रकरण कुधफतेहगड पोलीस ठाण्याच्या (Kurh Fatehgarh Police Station) हद्दीमधील एका गावातील आहे. 15 जुलै रोजी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार त्याच गावात राहणाऱ्या एका तरुणानं त्याच्या चार साथीदारांसह केला. 15 जुलै रोजी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांचा आरोपीच्या साथीदारांना वाचवण्याचा प्रयत्न

पोलिसांनी आरोपीला अटक न करता त्याच्या साथीदारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केलाय. याबाबत पीडित कुटुंबीयांनी संबंधित अधिकाऱ्यांकडं तक्रारी केल्या. मात्र, विनवणीनंतरही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही, यामुळं पीडितेनं बुधवारी आत्महत्या केलीय. बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी आरोपींना पकडण्यासाठी एसओजी टीम तयार केली असून उर्वरित आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवलाय.

पोलिसांचा बंदोबस्तासाठी दबाव

पीडितेनं बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची आई शाळेत गेली होती. ती परत आली, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा उघडला असता, आतमध्ये मुलीचा मृतदेह फासावर लटकलेला होता. पोलिस सातत्यानं बंदोबस्तासाठी दबाव टाकत होते, असा आरोप आईनं केला आहे. सध्या कोणत्याही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याचं एसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT