AAP leader Satyendar Jain Sukesh Chandrasekhar
AAP leader Satyendar Jain Sukesh Chandrasekhar esakal
देश

AAP च्या मंत्र्याला संरक्षण रक्कम म्हणून दिले तब्बल 10 कोटी; तुरुंगात असलेल्या चंद्रशेखरच्या दाव्यानं खळबळ

सकाळ डिजिटल टीम

चंद्रशेखरनं जेलमधून एलजी सक्सेना यांना पत्र लिहून जैन यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) यानं आप नेते सत्येंद्र जैन (AAP leader Satyendar Jain) यांना संरक्षण रक्कम (Protection Amount) म्हणून 10 कोटी रुपये दिल्याचा दावा केलाय.

सुकेश चंद्रशेखरनं जेलमधून एलजी व्हीके सक्सेना (LG VK Saxena) यांना पत्र लिहून जैन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सुकेशनं या प्रकरणाची एलजीकडून चौकशी करण्याची मागणी केलीय. सुकेशनं आपल्या पत्रात लिहिलंय, सत्येंद्र जैन मला सतत पैसे देण्यास भाग पाडत होते. दबावामुळं माझ्याकडून 2-3 महिन्यांच्या कालावधीत 10 कोटी रुपये वसूल करण्यात आले. हे संपूर्ण पैसे कोलकाता येथील सत्येंद्र जैन यांचे निकटवर्तीय चतुर्वेदी यांनी घेतल्याचा दावा सुकेश यानं केलाय. अशा प्रकारे मी सत्येंद्र जैन यांना 10 कोटी रुपये दिल्याचा दावा सुकेशनं केलाय.

'मला, हायकोर्टात दाखल केलेली तक्रार मागं घेण्यास सांगण्यात आलंय'

सुकेश पुढं म्हणाला, सत्येंद्र जैन गेल्या 7 महिन्यांपासून तिहार तुरुंगात बंद आहेत. त्यांनी मला डीजी जेल (DG Jail) आणि जेल प्रशासनाकडून धमकी दिलीय. मला हायकोर्टात दाखल केलेली तक्रार मागं घेण्यास सांगण्यात आलंय. मला त्रास दिला जात असून धमकावण्यात येत आहे. मला 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. मला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. सत्येंद्र जैन हे त्यावेळी तुरुंगमंत्री होते. त्यावेळी ते अनेकवेळा तुरुंगात आले आणि तपास यंत्रणेसमोर मला दिलेल्या देणग्यांची माहिती देऊ नका, असं सांगितलं.

एलजीला लिहिलेल्या पत्रात चंद्रशेखर म्हणाला, '2019 मध्ये सत्येंद्र जैन पुन्हा तुरुंगात आले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा सचिव आणि मित्र सुशीलही होता. सत्येंद्र जैन यांनी माझ्याकडं प्रत्येक महिन्याला संरक्षण रक्कम म्हणून 2 कोटी रुपये मागितले. जेणेकरून मी तुरुंगात सुरक्षित राहू शकेन आणि मला तुरुंगात मूलभूत सुविधा मिळू शकतील.'

पक्षाला 50 कोटींहून अधिक निधी दिला - सुकेश

सत्येंद्र जैन यांना 2015 पासून ओळखत असल्याचा दावा सुकेशनं केलाय. आपल्याला दक्षिण भारतात महत्त्वाचं पद दिलं जाईल, असं आश्वासन आम आदमी पक्षानं दिलं होतं, त्यामुळं मी पक्षाला 50 कोटींहून अधिक निधी दिल्याचा दावाही त्यांनी केलाय. इतकंच नाही तर सुकेशच्या म्हणण्यानुसार, त्याला राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षानं मदतीचं आश्वासनही दिलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT