Shashi Tharoor chats with Supriya Sule as Farooq Abdullah gives a speech. Memes explode on Twitter google
देश

शशी थरूर यांनी संसदेत काय केले पाहा…. नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

चित्रफितीत फारूख अब्दुल्ला भाषण करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे सुप्रिया सुळे बसल्या असून शशी थरूर पुढे झुकून, हनुवटी बाकावर टेकवून सुळे यांच्याशी गप्पा मारण्यात दंग आहेत. या फितीमधील मूळ आवाज काढून त्याऐवजी ‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे लावण्यात आले आहे.

नमिता धुरी

मुंबई : काँग्रेस खासदार शशी थरूर पुन्हा एकदा नेटकऱ्यांसाठी चेष्टेचा विषय ठरले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला यांचे भाषण संसदेत सुरू असताना थरूर मात्र बाकावर हनुवटी टेकवून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी गप्पा मारण्यात दंग आहेत. या प्रसंगावरून समाजमाध्यमांवर अनेक मिम्स प्रसारित होत आहेत.

ट्विटरवरील ‘फारअगो अब्दुला’ या नावाच्या खात्यावरून एक दृकश्राव्य फीत प्रसारित करण्यात आली आहे. यात फारूख अब्दुल्ला भाषण करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे सुप्रिया सुळे बसल्या असून शशी थरूर पुढे झुकून, हनुवटी बाकावर टेकवून सुळे यांच्याशी गप्पा मारण्यात दंग आहेत. या फितीमधील मूळ आवाज काढून त्याऐवजी ‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे लावण्यात आले आहे. तसेच इतरही काही मिम्स तयार करण्यात आले आहेत.

थरूर यांच्या मागे बसलेले खासदार हनुवटी हातात पकडून विचार करताना दिसत आहेत. त्यांच्याभोवती गोल करून ‘अच्छा बेटा विल सी यू आऊटसाइड’ असे वाक्य लिहिण्यात आली आहे. ‘ठिकाण कोणतेही असो, चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे’ असेही थट्टेने लिहिण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT