Navjot Singh Sidhu Team eSakal
देश

सिद्धूवर बहिणीचा गंभीर आरोप: म्हणाल्या, संपत्तीवर कब्जा करून...

निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात.

सकाळ डिजिटल टीम

पंजाब: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Legislative Assembly 2022) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) वादात भोवऱ्यात सापडले आहेत. वडिलांच्या निधनानंतर सिद्धूने मला आणि आईला घरातून हाकलून दिले. संपत्तीवर कब्जा करून आईला बेघर केले. शेवटी आईचा दिल्ली रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत मृत्यू झाला होता.असा आरोप अमेरिकेत राहणाऱ्या डॉक्टर सुमन तूर यांनी केला आहे.तसेच एक फोटोही त्यांनी व्हायरल केला आहे.

सिद्धूची बहीण असल्याचा दावा करणाऱ्या सुमन तूरने सांगितले की, नवज्योतसिंग सिद्धू ने आपले आई आणि वडिल विभक्त झाले होते असे खोटे सांगितले आहे. नवज्योतची सासू जसवीर कौर यांनी आमचे घर उद्ध्वस्त केले आहे. मी माझ्या वडिलोपार्जित घरी कधीही जाऊ शकले नाही. मी जेव्हा अमृतसर येथील घरी नवज्योत सिद्धूला भेटायला गेले तेव्हा त्यांनी गेट उघडले नाही. आणि त्याचा मोबाईलही बंद होता.

निवडणुकीच्या तोंडावर असे विधान करत आहेत का असे सुमन तूर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी एक आर्टीकल वाचले त्यात सिद्धू यांनी आईबद्दल विधान केले होते की ते आणि त्यांचे वडील 2 वर्षांचे असताना वेगळे झाले होते. त्याचा आई-बहिणींशी काहीही संबंध नाही. आज सिंद्धूने करोडो रुपये कमावले आहेत. पण त्याने आपल्या कुटुंबाशी काहीही संबंध ठेवला नाही. तसेच आपल्याला आणखी एक बहीण होती. पण त्यांचा मृत्यू झाला आहे. तीची मुलगी विशेष बालक आहे. तीला घेऊन मी अमेरिकेला आले. सिध्दूने आई आणि वडील विभक्त होण्याचे केलेल्या विधानात सत्य नाही असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT