नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांच्या अटकप्रकरणी संसदेच्या विशेषाधिकार आणि अचारसंहिता समितीकडून राज्याच्या बड्या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. तसेच १५ जून रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ज्या अधिकाऱ्यांना समन्स बजावलं आहे त्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. (Summons to CS of Maharashtra from Parliamentary Committee in Navneet Rana arrest case)
हनुमान चालिसा प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक झाला होती. यानंतर आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार करत नवनीत राणा यांनी लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्यातील बड्या अधिकाऱ्यांना तोंडी पुराव्यांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव मनोजकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे या बड्या अधिकाऱ्यांना १५ जून रोजी संसदेच्या समितीसमोर दुपारी १२.३० पर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात सुरुवातीला नवनीत राणा यांची साक्ष २३ मे रोजी या समितीनं नोंदवली होती. या सुनावणीत त्यांनी ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले त्या सर्व अधिकाऱ्यांना या समितीनं बोलावलं आहे. यावरुन समितीनं राणांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतल्याचं दिसत आहे. तसेच काही राजकीय नेत्यांचीही नावं या समितीसमोर राणा यांनी घेतली होती. यामध्ये शिवेसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.