Sunny_20Deol_ 
देश

सनी देओल यांचे विचित्र ट्विट; नेमके कोणाच्या बाजूने

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी आंदोलनाचा आज 10 वा दिवस असून 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनाच्या मुद्द्यावरुन पंजाबी स्टार दिलजीत दोसांझ आणि बॉलिवूड कलाकार कंगना रनौत आपसात भीडले होते. त्यांनतर सोशल मीडियावर चांगलाच धुराळा उडाला. आता शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते आणि गुरदासपूरचे भाजपचे लोकसभा खासदार सनी देओल यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

सर्व जगाला मी विनंती करतो की हा शेतकरी आणि आमच्या सरकारमधील मुद्दा आहे. यामध्ये अन्य कोणत्याही लोकांनी पडू नये, कारण सरकार आणि शेतकरी आपसात चर्चा करत असून याचे समाधान लवकरच मिळेल, असं सनी देओल म्हणाले आहेत. मला माहितेय की अनेक लोक याचा फायदा उठवू पाहात आहेत आणि अनेक लोक अडचणी निर्माण करत आहेत. हे लोक शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत नाहीहेत, तर आपला स्वार्थ पाहात आहे. दीप सिद्धू, जे निवडणुकीवेळी माझ्यासोबत होते, खूप काळापासून माझ्यासोबत नाहीयेत. त्यामुळे ते जे काही करत आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही, असंही ते म्हणाले आहेत.

8 डिसेंबरच्या 'भारत बंद'ला देशव्यापी स्वरुप; काँग्रेससह डझनभर...

मी माझ्या पक्षासोबत आणि शेतकऱ्यांसोबत आहे आणि नेहमी शेतकऱ्यांसोबत असेन. आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला आहे आणि मला विश्वास आहे की सरकार त्यांच्यासोबत चर्चा करुन योग्य निकालापर्यंत पोहोचेल, असं सनी देओल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. देओल यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात  (Farm Law) शेतकऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन (Farmer's Protest) देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप घेत आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. यात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानसह अनेक राज्यातील संघटना भाग घेणार आहेत. अनेक राजकीय पक्षांनीही या भारत बंदला समर्थन दिले आहे. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसनेही या बंदला पाठिंबा दिला आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा म्हणाले की, "काँग्रेसने 8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पक्ष कार्यालयासमोरही आंदोलन करणार आहोत. राहुल गांधींचा पाठिंबा शेतकरी आंदोलनाला मजबूतीने देण्यासाठी हे पाऊल असेल. प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करु."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT