पोलिसांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. पण हल्ली उत्तर प्रदेशचे पोलिस या प्रतिमेला बदलण्याचा प्रयत्न करत आहे. हा पोलिस शिपाई मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून गरीब मुलांना मदत करत आहे.
गोंडा जिल्ह्यातील एक पोलिस शिपाई ड्यूटीसोबतच समाजात पोलिसांच्या प्रतिमेला खूप बदलण्याचा प्रयत्न करत आहे. शिपाई मो. जाफर हे त्यांची ड्यूटी संपल्यानंतर गरीब मुलांना एक तास मोफत शिकवतोय. जाफर हे एका झाडाखाली मुलांना शिकवतात. (Super 30 up police constable coaching or teaching poor students goes viral)
पोलिस शिपाईच्या त्यांच्या शाळेत वर्ग 1 से 10 पर्यंत मुलं ट्यूशनला येतात. येथे दररोज एक तास ते गणित, सायंससह सर्व विषय शिकवतात. याच शाळेत नवोदय स्कूलमध्ये अॅडमिशन घेण्याची तयारी करणारे मुलं सुद्धा येतात.
मुलांच्या मते हे पोलिस शिपाई खूप छान शिकवतात. त्यांच्यामुळे त्यांना खूप मदत होते. प्रायवेट ट्यूशन लावायला त्यांच्याकडे पैसे नाही पण मो. जाफर सर यांच्या क्लासमुळे त्यांना खूप मदत होते. एवढंच काय तर मुलांचे पालक सुद्धा या पोलिस शिपाईंच्या या शाळेमुळे आनंदी आहे.
मो. जाफर यांच्या विषयी
मों जाफर ड्युटी संपल्यानंतर कुठेही फिरायला जात नाही तर हा स्वत:चा अमुल्य वेळ ते मुलांना शिकवतात. सायंसमधून ग्रॅजुएशन करणारे मो. जाफरचा सिविल सर्विसमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
मो. जाफरने आयएएस आणि आयपीएस बनण्यासाठी स्पप्न पाहलं होतं. त्यांच्या मते जर या मुलांना मी शिक्षण देऊ शकलो आणि यातील कुणीही यशस्वी झालं तरी माझं स्वप्न पुर्ण होणार.
सुपर 30 चित्रपटातही असंच काही दाखवलं होतं. केब्रिज विद्यापिठात प्रवेश मिळूनही, केवळ गरिबीमुळे तिथे प्रवेश घेऊ न शकणाऱ्या एका आनंद नावाच्या व्यक्तीने ऐशोआरामाचं करियर सोडून 30d विद्यार्थ्यांना आयआयटीचं शिक्षण दिलं जे अतिशय गरिब होते. उत्तर प्रदेशच्या या पोलिस शिपाईमध्येही हाच जुनून दिसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.