homosexuality
homosexuality  
देश

समलिंगी संबंधांबाबत आज सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

पीटीआय

नवी दिल्ली : समलिंगी संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालय आज (ता. 6) निकाल देणार आहे. सुमारे 158 वर्षे जुने असलेले, समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम 377 वैध आहे की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्याआधी न्यायालयाने कठोर शब्दांत टिपणी करताना, हे कलम संपुष्टात आणण्याची गरज असून, यामुळे समलैंगिकतेबरोबर सामाजिक कलंक जोडला गेला आहे आणि हे समाजात समलैंगिकांच्या प्रती भेदभावाचे मोठे कारण असल्याचे म्हटले होते.

केंद्र सरकारनेही सुरवातीला या प्रकरणी भूमिका मांडण्यास नकार दिला होता व नंतर न्यायालयाच्याच सद्‌सद्विवेकबुद्धीवर निर्णय सोडून दिला होता.
समलिंगीसंबंधांबाबतचा मुद्दा पहिल्यांदा 2001मध्ये नाझ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने उपस्थित केला होता. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून समलिंगी संबंध हा गुन्हा ठरविण्यात येऊ नये, अशी मागणी केली. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना प्रौढांमधील समलिंगी संबंध हे कायदेशीर ठरविले होते. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2013मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरविला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

SCROLL FOR NEXT