Supreme Court 
देश

शर्ट न घालताच सुप्रिम कोर्टात हजर; कोर्टाने झापझाप झापलं

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सुप्रिम कोर्ट ही भारतातील ही एक महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. तिचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असते. मात्र, अशा काही घटना घडतात ज्यामध्ये कोर्टाच्या सभ्यतेचे उल्लंघन होते. या प्रकाराविषयी कोर्टाकडून थेट नाराजी देखील व्यक्त केली जाते. कोरोना काळात कोर्टाचे सारे कामकाज व्हर्च्यूअली व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे केले जाऊ लागले. या दरम्यान तर अनेक चित्रविचित्र प्रकार घडून आलेले दिसून आले. मंगळवारी सुप्रीम कोर्टातील व्हर्च्यूअल सुनावणी दरम्यान एक व्यक्ती शर्ट न घालताच उपस्थित राहिल्याने रागाला सामोरे जावे लागले. जस्टीस एल. नागेश्वर राव आणि हेमंत गुप्ता व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे ही सुनावणी करत होते. त्यादरम्यान स्क्रीनवर एक शर्ट न घातलेला व्यक्ती दिसून आला.

या घटनेबाबत नाराजी व्यक्त करुन कोर्टाने म्हटलं की, गेल्या सात-आठ महिन्यांपासून व्हिडीओ-कॉन्फरंसिंगद्वारे सुनावणी केली जात आहे तरीही या प्रकारच्या घटना अजूनही घडत आहेत. हे काही बरोबर नाही. असं बेंचने म्हटलं. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सुप्रीम कोर्टाने व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे सुनावणी करण्यास सुरवात केली होती. गेल्या महिन्यात अशाच व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे केल्या जाणाऱ्या सुनावणीत एक घटना घडली होती. 26 ऑक्टोबर रोजी एक वकील याचप्रकारे विना शर्टामध्ये दिसून आला होता. यावेळी जस्टिस डि. वाय चंद्रचूड सुनावणी करत होते. त्यावेळी चंद्रचूड यांनी म्हटलं होतं की, मला कुणाविषयीही कठोर वागायला आवडत नाही पण तुम्ही स्क्रीनवर आहात. तेंव्हा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. असं चंद्रचूड यांनी म्हटलं. जूनमध्ये एक वकील त्याच्या बेडवर आडवा पडलेला दिसला. त्याच्या अशा कृत्यामुळे चिडलेल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी किमान कोर्टाच्या काही सभ्यता तरी पाळा, असं म्हणून सुनावले. 

टी-शर्ट घालून बेडवर आडवा पडलेल्या अवस्थेत असताना "कोर्टात हजर राहणे अत्यंत अयोग्य आहे" असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. अलिकडेच एप्रिल महिन्यात, राजस्थान  हायकोर्टाने असाच एक प्रकार घडल्यामुळे कामकाज तहकुब केलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT