supreme court sakal media
देश

'शहराचा गळा घोटलात आणि आता...' सुप्रीम कोर्टाची शेतकऱ्यांवर नाराजी

सकाळ डिजिटल टीम

कृषी कायद्याविरोधात जंतर मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात जंतर मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालायने शेतकऱ्यांकडून रस्त्यावर केल्या जाणाऱ्या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालायने म्हटलं की, तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही इतरांची संपत्ती नष्ट करू शकत नाही. एका बाजुला तुम्ही पूर्ण शहराचा गळा घोटला आहे आणि आता न्यायालयाकडे शहरात आंदोलनासाठी परवागनी मागत आहात.

लोकांचासुद्धा अधिकार आहे. तुम्ही न्यायव्यवस्थेचा विरोध करत आहात का? तुम्ही महामार्ग रोखले आहेत आणि म्हणताय की शांततेत विरोध करतोय अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. जंतर मंतरवर आंदोलनासाठी परवानगीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, शहरातील लोकांनी त्यांचे उद्योग बंद करावेत का? शहरातील लोक या आंदोलनामुळे आनंदी राहतील का असा प्रश्नही विचारला. एकदा तुम्ही ठरवलंच असेल की न्यायालयात जायचं आहे तर विरोध कशासाठी असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायाधीश ए एम खानविलकर आणि न्यायाधीश सीटी रविकुमार यांच्या पीठाने ही सुनावणी केली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला होणार आहे. किसान महापंचायतीकडे याबाबत प्रतिज्ञापत्र मागितलं आहे की, सध्या हायवेवर सुरु असलेल्या आंदोलनात तुमचा सहभाग नाही. राजस्थानच्या किसान महापंचायतीने त्यांनाही जंतर मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. ज्या पद्धतीने संयुक्त किसान मोर्चाला परवानगी दिलीत तशी आम्हालासुद्धा द्या असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'प्रश्नपत्रिका हव्यातच कशाला?' पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींनी काय सुचवला जालीम उपाय?

IND vs WI 4th T20: भारत-वेस्ट इंडिजचा चौथा टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या!

वडिलांचा आजार…डोक्यावर कर्ज! दुष्काळाने संसारच उद्ध्वस्त

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

SCROLL FOR NEXT