Supreme Court  
देश

मुस्लीम महिलांच्या लग्नाच्या वयाबाबत SCची केंद्र सरकारला नोटीस; आता 4 आठवड्यात...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - धार्मिक तत्त्वांचा हवाला देत अल्पवयीन मुलींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या विविध उच्च न्यायालयांच्या निर्णयांना राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुख्य न्यायाधीश (CJI) जस्टिस डीवाय चंद्रचूड़ आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.

केंद्र सरकारने याबाबत चार आठवड्यात उत्तर देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टासह इतर अनेक उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांना स्थगिती द्यावी आणि त्यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या निकालांमध्ये पर्सनल कायद्याचा दाखला देत मुस्लिम मुलींना मासिक पाळी सुरू झाल्यानंतर कधीही करण्यात येणाऱ्या लग्नाला वैध ठरवले आहे. या निर्णयांमुळे पोक्सो कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन होत असल्याचंही याचिकाकर्त्या राष्ट्रीय महिला आयोगानं सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे. तसेच कोणत्याही कृतीत आणि कायद्यात मतभेद असतील तर कायद्याला प्राधान्य देण्याच्या नियमाचे काय होणार? असा प्रश्नही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मार्ग मराठी, प्रवास मराठी

No Bread High-Protein Sandwich: वीकेंडला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हवाय? मग ही नो-ब्रेड ‘मूग डाळ सँडविच’ रेसिपी तुमच्यासाठीच

IPL 2026 : मॅन ऑफ दी मॅच, Orange Cap... विराट कोहलीने रणशिंग फुंकले! मोठा दावा; म्हणाला, चिन्नास्वामी स्टेडियमवर आता...

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

SCROLL FOR NEXT