देश

Supreme Court Notice : शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना, शेतीमालाची दरनिश्चिती अन् करासंदर्भात कोर्टाची केंद्राला नोटीस

संतोष कानडे

नवी दिल्लीः शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. द शीख चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केंद सरकारसह वाणिज्य मंत्रालयाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकेवरुन केंद्राला नोटीस बजावली आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठीचे राष्ट्रीय धोरण २००७, राष्ट्रीय शेतकरी आयोग २००४ यांच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात याचिकेत मागणी केली आहे. यासह शेतकऱ्यांना लावले जाणारे टॅक्स, त्यांना मिळणारे अनुदान आणि इतर बाबींचा याचिकेत समावेश आहे.

प्रकरण न्यायमूर्ती कांत आणि केव्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर कोर्टाने सरकारला नोटीस बजावत असल्याचं सांगितलं. कोर्टाने म्हटलं, ''आम्ही केंद्राला नोटीस पाठवतो. परंतु तुम्ही या प्रकरणामध्ये सखोल अभ्यास करणे गरजेचे होते. यासंबंधीचा डेटा संकलन करण्याची अपेक्षा आहे'' असं कोर्टाने याचिकाकर्त्यांना म्हटलं होतं.

कृषीमालाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन ढासळून जातं. त्यांना आधार देण्यासाठी वेगळ्या निधीची गरज असल्याचं याचिकेमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय याचिकेमध्ये म्हटलंय की, पावसाची अनिश्चितता, बाजारमूल्याची अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांना कॉर्पोरेट्सच्या बरोबरीने बघितलं पाहिजे आणि त्यांना गरीबीच्या पाशातून बाहेर काढण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

विशेष बाब म्हणजे, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा जराही विचार न करता जागतिक व्यापाराच्या घडामोडींमध्ये हस्तक्षेप केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भारतात शेतीमालाचे दर निश्चत होत नाहीत असा आरोप केला आहे. त्यावरुन आता कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस धाडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT