Supreme Court Justice MR Shah suffers heart attack Supreme Court Justice MR Shah suffers heart attack
देश

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एमआर शहा यांना हृदयविकाराचा झटका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायमूर्ती एमआर शाह (६४) यांना गुरुवारी (ता. १६) हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तात्काळ हिमाचल प्रदेशातून हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीत आणण्यात आले. त्यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील आणि भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी ही माहिती दिली आहे. (Supreme Court Justice MR Shah suffers heart attack)

एमआर शाह (MR Shah) यांना हिमाचल प्रदेशात हृदयविकाराचा झटका आला. आता न्यायमूर्ती शाह यांना हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीला आणण्याची व्यवस्था केली जात आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्विट त्यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी गृह मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे.

न्यायमूर्ती शाह (MR Shah) हे गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही राहिले आहेत. यानंतर त्यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. एका प्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. मोदी हे लोकप्रिय, प्रिय आणि दूरदर्शी नेते असल्याचे शाह म्हणाले होते.

न्यायमूर्ती एमआर शाह यांनी १९ जुलै १९८२ रोजी वकील म्हणून नावनोंदणी केली. त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात दिवाणी, फौजदारी, घटनात्मक, कर आकारणी, कामगार, सेवा आणि कंपनी प्रकरणांमध्ये सराव केला. तसेच जमीन, घटनात्मक, शिक्षण या विषयात स्पेशलायझेशन संपादन केले.

शाह यांची ७ मार्च २००४ रोजी गुजरात उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २२ जून २००५ रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती. १२ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (Justice) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) नियुक्ती झाली. शाह हे १५ मे २०२३ रोजी निवृत्त होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT